महत्वाच्या बातम्या
-
पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग | परिसरात धुराचे लोट
सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना, दुपारी दोन वाजताची घटना, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अत्याचार झाले तेव्हाच गुन्हा दाखल करायचा होता | संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिका भरती 2021 | अर्ज डाउनलोड करा
Pune Municipal Corporation Recruitment 2021. पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो रेल्वे भरती २०२१ साठी १३९ जागांवर सुपरवायझर आणि नॉन-सुपरवायझरी (तंत्रज्ञ, स्टेशन नियंत्रक / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता पोस्ट) भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे - फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे आज राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणूक | मोर्चेबांधणीसाठी स्वतः राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिका निवडणुक २०२२ | भाजपसाठी हा पराभव भविष्यातील धोक्याची नांदी?
राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेले यश अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे ठरते. तर बालेकिल्ल्यातच भारतीय जनता पक्षाच्या पदरी पडलेली निराशा पक्षाला पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून या मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर अखेर विजयी झाले आहेत. ३४ व्या बाद फेरीत जयंत आसगावकर विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात भाजपचा 'वन वे पराभव' | प्रदेशाध्यक्षांच्या नैत्रुत्वात पुणे हातचं गेलं
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.
4 वर्षांपूर्वी -
या निवडणुकीच्या निकालांनंतर राज्य सरकार व नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल - गिरीश बापट
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून, मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवण्यात आली असून, इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंपा'चे ते वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे | उपमुख्यमंत्री संतापले
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस | रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आमदार होण्याची स्वप्नं पाहू नकोस, मारुन टाकीन, अशा शब्दात साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मेधा कुलकर्णींचा पत्ता कट केला | आता सांगलीचा उमेदवार देत पुन्हा पत्ता कट
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत डिपॉझिट जप्त | आता बिचुकले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सज्ज
कलर्स मराठीवरील बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी २०१९ मधील निवडणूक थेट मुंबईतील वरळी मतदारसंघांतून म्हणजे थाट आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धच लढवली होती. त्यावेळी चर्चेत असले तरी निवडणुकीत काही विशेष करतील असं चित्र नव्हतं. त्याप्रमाणेच निकाल आले आणि अभिजित बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र आता अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता त्यांनी थेट पदवीधर मतदारसंघाची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं
राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास आग
आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue)उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुण्यात मित्राकडूनच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने क्रूर हत्या
मागील भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची अंगाची थरकाप उडवणारी घटना पुण्यातील औंधमध्ये घडली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
यांच्या बापाची पेंड आहे का? | चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा
बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर…
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टोला लगावला. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये पवार यांना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या । बुधवार पेठेत तणावाचं वातावरण
पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागूच राहणार | पुण्यात?
मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने जमावबंदीचा आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो