महत्वाच्या बातम्या
-
भाजपचे व अपक्ष आमदार आमच्या संपर्कात, लवकरच निर्णय घेऊ पण मेरीटवर: जयंत पाटील
राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक सुरु असून तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, धगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना झळकले एकाच पोस्टरमध्ये
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना. पुण्यातील कोंढवा भागात एनसीपी’च्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
पिक विम्यावरून इफको टोकियो कंपनीत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक
राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत दिली नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं इफको टोकिओ विमा कंपनीचं कार्यालय फोडलं होतं. पण या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत आम्ही सहभागीच नाही, असं कंपनीचं म्हणणं होतं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खातरजमा न करता भलत्याच वीमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा असल्याचं दाखवलं, असं आता बोललं जात आहे. त्यानंतर या कार्यकर्त्यांवर सर्वच थरातून टीका करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील या स्टंटबाज कार्यकर्त्यांचा शोध सुरु केला होता आणि त्यानंतर ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांचं शेतकरी प्रेम एक नौटंकी? पीक-विम्याशी संबंध नसलेल्या कंपनीचं कार्यालय फोडलं
राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत दिली नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं इफको टोकिओ विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. पण या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत आम्ही सहभागीच नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खातरजमा न करता भलत्याच वीमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा असल्याचं दाखवलं, असं आता बोललं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नव्हे! राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार: जयंत पाटील
राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपत्तिग्रस्त भागांना भेट दिली. अन्य मंत्र्यांनीही तोच कित्ता गिरवला मुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उद्याच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतील. यामुळे आता या सत्तेच्या पेचप्रसंगात थेट पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करून कोणता तोडगा काढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बोरघाटात खासगी बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी
दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यात चंपा साडी सेंटरचं राष्ट्रवादीकडून उदघाटन
”आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” असे म्हणत एनसीपीच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडाेजीबाबा चाैक येथे एनसीपीकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ घाेषणा देण्यात आल्या.
6 वर्षांपूर्वी -
स्वकीयांनी ताकत दिली नाही, पण पवार साहेबांनी ऊर्जा दिली: मनसे नेत्या रुपाली पाटील
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
6 वर्षांपूर्वी -
किशोर शिंदे भाजपात या; शिंदे म्हणाले 'आधी मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांना सांभाळा'
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवाराला भारतीय जनता पक्षात प्रवेशाची खुली ऑफर देऊन टाकली. मात्र, वेळेचं बंधन ना पाहता चंद्रकांत पाटलांची ही ऑफर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत संगळ्यांसमोरच नाकारली. परंतु, खेळीमेळीत दिली गेलेली ही ‘ऑफर’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आयत्या बिळात चंदूबा..राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला
विधानसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहे, तशी प्रचाराला धार चढली आहे. वर्तमानपत्रे, मोबाइल, टीव्ही वाहिन्यांसह सोशल मीडियातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज एका जुन्या मराठी म्हणीचं विडंबन करून पाटलांवर हल्ला चढवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: २०१४ पासून भाजपच्या मोबाईल टॉर्च इव्हेन्टला अनेक शहरं फसली; नंतर विकासाला मुकली?
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: मोदींनी भाजपच्या खासदार व आमदारांच्या ५ वर्षातील कामांचा हिशेबच दिला नाही
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
सलग ५ वर्ष ५ महिने सत्तेत तरी मोदी पुणेकरांना म्हणाले, 'सत्तेत येऊन ५ महिने झाले'
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटील आल्याने आता ब्राह्मण समाजातच फूट पडण्यास सुरुवात? सविस्तर
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यसह इतर तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
३७०च्या मुद्द्याआड शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई'बाबत सत्ताधारी पळ काढत आहेत: अजित पवार
पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना थेट 'चंपा' संबोधत जोरदार प्रतिउत्तर दिलं
पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
6 वर्षांपूर्वी -
समस्या कोथरूडच्या आणि जावईबुवांची 'लडाख पे चर्चा'; सासरवाडीलाच भावनिक टोप्या?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक मुद्दे न आणता राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ते घडणार आहे पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कलम ३७० वर लडाखचे खासदार जयमांग नामग्याल यांचं खास व्याख्यान आयोजित केलं आहे. आज म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी कोथरूडमधल्या सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संध्याकाळी ४.३० ते ६ या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘एक चर्चा कलम ३७०, ३५ अ आणि लडाख’ वर अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्या पुण्यात राजगर्जना; नक्की काय बोलणार यावरून सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.
6 वर्षांपूर्वी -
पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?
निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या; कोथरूडमध्ये आघाडीचा मनसेला पाठिंबा
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची वर्णी लावली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात दुसरी भर म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण समाजाने देखील आक्षेप नोंदवला होता.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL