महत्वाच्या बातम्या
-
हडपसर: मनसेचे वसंत मोरे यांचा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल; तुफान गर्दी
मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या प्रसार माध्यमं गृहीत धरत असली, तरी अनेक मतदारसंघातील त्यांची तगडी फिल्डिंग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यातीलच एक म्हणजे, मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांचे लाडके तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांची मागील काही महिन्यांपासूनची तयारी पाहता स्वतः राज ठाकरेंनी तयारीला लाग असे आदेश आधीच दिले आहेत, असच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात शिवसेना आणि आरपीआयला एकच न्याय; आठही जागांवर भाजपकडून ठेंगा
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटलांसाठी मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांना 'ब्राह्मण द्वेष्टी' असं संबोधत कोथरुड मतदारसंघातून ब्राह्मण महासंघाचा तीव्र विरोध
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर येथील मतदारसंघातून निवडणूक लढण्याऐवजी चंद्रकांत पाटील सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते असं म्हटलं जातं आहे. शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण चंद्रकांत पाटलांना माहित असल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघाचा शोध काही दिवसांपासून सुरु केला होता.
5 वर्षांपूर्वी -
येवले चहावरील कारवाई; मनसे मराठी उद्योजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी
पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाच्या चहा पावडर आणि चहा मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. येवलेंच्या चहा पावडर, टी-मसाला आणि साखरेच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे माहितीपर लेबल नसल्याचे आढळले. तसेच, अन्य काही त्रुटीही आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून, सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप पुणेकरांना
पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: मुसळधार पावसाने १६ जणांचा मृत्यू, ९ जण अजूनही बेपत्ता
शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या.
5 वर्षांपूर्वी -
आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; जागावाटप बाजूला राहू द्या: छगन भुजबळ
मागील ३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच 'देवेंद्र-नरेंद्र चोर है' घोषणाबाजी
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हडपसरची जागा मनसे खेचून आणणार असल्याने भाजप हडपसर सेनेला देणार?
शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा तिढा अजून संपलेला नसतात काही जागांच्या अदलाबदलीची कारणं त्यासाठी पुढे करण्यात आली आहेत. पुण्यात भाजप सेनेला ठेंगा देण्यात तयारीत असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र शिवसेना पुण्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असल्याने भाजप हाती न येणाऱ्या पुण्यातील जागा शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे युतीचे ठरले असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. या बदलाचा फटका भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना बसण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत टिळेकर 'टिकणार' नसल्याने; महाजनादेश यात्रेच्या आडून वसंत मोरेंवर कारवाई?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या राज्यभर महाजानदेश यात्रा सुरु असून काल नगरवरून आता पुण्यातील हडपसर येथे धडकणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा जिथून जाते तिथल्या क्षेत्रातील विरोधकांना ताब्यात घेण्याचा धडाकाच मागील काही काही दिवसांपासून पोलिसांनी लावला आहे. या यात्रेदरम्यान विरोधकांनी कोणतीही निदर्शनं करू नये म्हणून पोलिसांना आधीच आदेश देण्यात आल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, या आव्हानानंतर रुपाली पाटील यांना नोटीस
भारतीय जनता पक्षाच्या राजवटीवर मनसेने यापूर्वीच हुकूमशाहीचा आरोप केला आहे. दडपशाही आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत विरोधकांना जेरीस आणण्याची रणनीती आता राजकारणात नवी राहिलेली नाही. तसाच काहीसा प्रकार पुन्हा पुण्यात घडला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांना पुणे पोलिसांनी गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूक: एकट्या पुण्यात भाजपाची १०० जणांची सोशल मीडिया वॉर रूम
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांचा मोठ्याप्रमाणावर वापर केला होता. सोशल मिडीयावर केलेल्या प्रचाराचा फायदा घेत घवघवीत यश मिळाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडनुकीसाठी सुद्धा भाजपची वॉर रूम सज्ज झाली असून समाज माध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता बांधकाम कामगारांना मिळणार अवघ्या ५ रुपयात जेवण
कोणतीही इमारत किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर यात अत्यंत महत्वाची भूमिका असते ती म्हणजे बांधकाम कामगारांची. याच कामगारांना आता अटल आहार योजनेअंतर्गत अवघ्या पाच रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. अटल आहार योजना क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने हि योजना गुरुवारी सुरु झाली. कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची महत्वाची भूमिका असते.
5 वर्षांपूर्वी -
रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
शुक्रवारी एनसीपी’च्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे. त्याला अनुसरून चित्र वाघ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यासंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
कसबा विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही? वेटिंगलिस्ट'वरील नेते ५ वर्ष वेटिंगवरच?
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड सर्वच पक्षातील उमेदवारांकडून होताना दिसते. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये राजकारण खेळत सध्या अचानकपणे पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असल्याचं वृत्त आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतर्गत चाचपणी देखील सूर केल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांच्या साड्यांचे पदर ओढले व चिमटे काढले; तक्रारींवर वरिष्ठ म्हणाले?
काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित नेत्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कालच्या पुण्यातील मेळाव्यातील प्रकारामुळे भाजपमध्ये असे किती लोकं अजून आहेत, जे महिलांसाठी धोकादायक आहेत. कारण स्वतः भाजपच्या महिलांनी रागाने पक्षाच्या ग्रुपवर मेसेज टाकून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल जेव्हा संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा, ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले’. सदर घटनेने संबधित महिला हादरून गेल्या असल्या तरी वरिष्ठांनी प्रकरण मिटवण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा: डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी: अजित पवार
शिरूरचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे एनसीपी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सध्या त्यांना मोठी जवाबदारी सोपविण्याचा गंभीर पणे विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
पुणे भीषण अपघात व नियती; पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र; एकत्रच आयुष्याचा अंत
आयुष्याच्या प्रवासात नियती कोणता खेळ खेळेल ते सांगता येणे कठीण आहे आणि तसाच काहीसा प्रकार पुणे येथील भीषण अपघातात घडला आहे. पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात तब्बल ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या १०वी’च्या बॅचमध्ये एकत्र शिकत होते. विशेष म्हणजे हे सर्व जण पहिल्या इयत्तेपासून जिवलग वर्ग मित्र होते.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना