महत्वाच्या बातम्या
-
एल्गार परिषद; प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? - हायकोर्ट
पुणे पोलिसांनी नक्षली समर्थकांवर केलेल्या कारवाईवरुन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले असून, त्यांनी संपूर्ण प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असताना पत्रकार परिषद का घेतली, असा सवाल उपस्थित करत मुंबई पोलिसांना फटकारलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
लवासा प्रकल्पाची राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका, दिवाळखोरीच्या वाटेवर?
लवासाला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांनी ‘लवासा प्रकल्प’ कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर एक याचिका केली होती. लवासा विरुद्धची ती याचिका लवादाने दाखल करून घेतल्यामुळे ‘एचसीसी’ने तशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये महत्वाची बैठक आयोजित केली आहे. स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नालासोपाऱ्यात एटीएस’ने हस्तगत केलेल्या स्फोटकाप्रकरणी सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात ओंकारेश्वर पूलापासून ‘अंनिस’ची ‘जवाब दो’ रॅली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज तब्बल ५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु इतका काळ उलटून सुद्धा हत्येमागील सूत्रधार मोकाटच असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ तर्फे ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला सीबीआयकडून अटक
तब्बल पाच वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात हे पहिलं यश मानलं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही: उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेरी पगडी नाकारुन पागोट्याला पसंती देण्याची प्रकाराने राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अनेक स्थरातून टीका करण्यात आली होती. पवारांच्या त्या कृतीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमा दरम्यान समाचार घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयावर बदनामी, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ पेजवर गुन्हा दाखल होणार?
एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या फेसबुक पेजवरून बदनामी केल्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्यमेव जयते वाॅटर कप साताऱ्याच्या टाकेवाडी गावाने पटकावला
अामिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला. यंदाचा प्रथम क्रमांक साताऱ्यातील टाकेवाडी या गावाने पटकावला आहे. आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पारिताेषिकाचे वितरण विजेत्यांना करण्यात अाले. बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा पारिताेषिक वितरण समारंभ पार पडला.
7 वर्षांपूर्वी -
वॉटर कप; राज ठाकरेंनी मांडलेलं सिंचन क्षेत्रातील वास्तव उपस्थितांना रुचलं, पण अजित पवारांना का झोंबल?
काल पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र चर्चा रंगली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या सिंचन क्षेत्रातील मांडलेल वास्तव, जे अजित पवारांना झोंबल्याचे पाहायला मिळालं.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
VIDEO; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणाबाजी..एक मराठा..लाख मराठा
बारामतीतील `गोविंदबाग`या शरद पवारांच्या बंगल्यासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या धरला. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी थेट ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
'ते' दुसरे उदयनराजे बनायला गेले, पण स्वतः उदयनराजें'नी 'तुम्ही उरका' आता म्हणत त्यांना जमिनीवर आणलं
मराठा आरक्षणावरून राजीनामा देणारे शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर बोलताना संधी मिळताच मूळ आरक्षणाच्या मुद्यावरील तोडगा किंवा मार्ग यावर न बोलता थेट मिळेल तेथे मराठ्यांच्या स्वतंत्र पक्ष काढण्यावर त्यांची गाडी घसरवताना वारंवार दिसत आहे. त्यामुळे त्यांचं राजीनाम्यानंतरच एकूण वागणं म्हणजे स्वतःला मराठ्यांच नैतृत्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्नं असल्याचं अनेकांना जाणवू लागल होत.
7 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
7 वर्षांपूर्वी -
पिंपरी: २०१२ मध्ये मनसेत नगरसेवक व ओळख, तर २०१७ ला कोलांटी घेत भाजपातून थेट महापौर
शेती करण परवडत नसल्याने १०वी होताच राहुल जाधवांनी ५ वर्षे रिक्षा चालवली. त्यानंतर २००६ मध्ये मनसेत प्रवेश करून २०१२ मध्ये ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, २०१७ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधून निवडून आले.
7 वर्षांपूर्वी -
अॅट्रॉसिटीच्या बाबतीत केंद्राची दिसलेली तत्परता, मराठा आरक्षणासाठी नाही दिसली? उदयनराजे
सरकारकडून वारंवार मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे थांबले पाहिजे असं आवाहन केलं जात आहे. परंतु सरकारने योग्य वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा समाजावर ही वेळच नसती आली नसती, असे खासदार उदयनाराजे भोसले म्हणाले. तसेच त्यांनी अॅट्रॉसिटीच्या विषयाला हात घालून केंद्रावर सुद्धा ताशेरे ओढले.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून मेटेंची शरद पवारांवर टीका, पण 'या' विडिओ'ने विनायक मेटे तोंडघशी पडण्याची शक्यता
भाजपच्या गोटात सामील झालेले विनायक मेटे सध्या पवार कुंटुंबियांवर मराठा आरक्षणावरून टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतंच त्यांनी थेट शरद पवारांच्या बाबतीत एक विधान केलं आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या तोंडावर शरद पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला.
7 वर्षांपूर्वी -
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी गर्दी
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रभादेवी परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा महत्व लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL