महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण - शिवशाही बसला मोर्चेकरांनी दिली वाट
मराठा आरक्षण – शिवशाही बसला मोर्चेकरांनी दिली वाट
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; चाकण'मध्ये अनेक बसेसची जाळपोळ
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये हिंसक मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. कारण आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी संतप्त होऊन २३-३० बसेस जाळल्या आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी जमावबंदी सुरु केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम
मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचं राज ठाकरेंच्या अजान'च्या वक्तव्यावर परखड मत, वक्तव्याचा विपर्यास!
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात पदाधिकारी मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जैन, राम मंदिर तसेच मुस्लिम समजासंबंधित रोखठोक मत व्यक्त केलं आहे. परंतु त्यात त्यांनी अजान’च्या संबंधित वक्तव्य केलं, तेच केवळ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केलं गेलं आणि मूळ विषयाला बगल देऊन राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं परखड मत मनसेचे इरफान शेख यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही: शरद सोनवणे
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सुद्धा मंचावर उपस्थित होते. अनेक दिवसानंतर ते आज मनसेच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित सुद्धा केलं. त्यांच्या रोखठोक भाषणातून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा जागविण्याचे काम केले.
7 वर्षांपूर्वी -
आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील: राज ठाकरे
सध्या मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असताना सर्वच पक्षांकडून बचावात्मक प्रतिक्रिया येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोख ठोक भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त ते पुण्यात आले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेणगावच्या जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
शेणगावच्या अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपुरात सकाळी साडेतीनच्या सुमारास ही विठूरायाची ही शासकीय पूजा पार पडली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री व आमदार सध्या संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाही: अजित पवार
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं असता उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावेळी रंगलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
NEET वैद्यकीय शिक्षणात प्रथम राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवं: राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा संबंधित गंभीर विषयाला हात घातला. काही दिवसांपूर्वी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पालक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.
7 वर्षांपूर्वी -
उद्या भाजप सरकार गेल्यावर, त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून त्यामुळे अनेक प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यां आक्रमक पवित्रा घेत झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’
राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.
7 वर्षांपूर्वी -
विनायक निम्हण यांची उध्दव ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ, शिवबंधन काढून काँग्रेसचा हात धरणार?
काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती आणि मी वाघाच्या पाठ थोपटण्यासाठी आल्याची स्तुतिसुमनं उधळली होती. परंतु काल जेव्हा तेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले असता विनायक निम्हण यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी -
भाजप सोशल मिडिया'चा २०१४ मधील 'प्लॅन' २०१९ मध्ये अधिक ताकदीने वापरणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आयटी-सेल योद्ध्यांनो शरद पवारांपासून सर्व विरोधकांना उत्तर देण्यास तयार रहा
आगामी निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असल्याने भाजपच्या आयटी-सेल योद्ध्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर देण्यासाठी कंबर कसली पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सुद्धा सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आदेश अमित शहा यांनी त्यांच्या टीमला दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता: संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडेंनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन करताना हे विधान केले आहे, ज्यामुळे पुन्हा वाद उफाळून येऊ शकतो.
7 वर्षांपूर्वी -
ख्रिस्ती धर्मीयांबाबत वादग्रस्त विधान, भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे: शरद पवार
मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवर चारही बाजूने टीकेचा भडीमार होत असताना, आता राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे,’ अशा तिखट शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA