महत्वाच्या बातम्या
-
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार आग्रही नाही ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे | रोहित पवारांचा टोला
राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आता राज्यात संघर्ष उभा करतोय - प्रवीण गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार कोर्टात गेलं तरी राज्यपाल म्हणाले 'राज्य सरकारचा आग्रह नाही' ?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण पार पडले. यानंतर राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (पुणे) मध्ये 15 जागांसाठी भरती | त्वरा करा
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड भर्ती 2021. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 15 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 18 ऑगस्ट 2021 पूर्वी एमएनजीएल भारती 2021 साठी योग्य माध्यमाद्वारे अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेची अनधिकृत नळधारकांसाठी अभय योजना | कसा आणि कुठे कराल अर्ज?
पुणेकरांसाठी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सिरमच्या अध्यक्षांचा गौप्यस्फोट | पुण्याला सर्वाधिक लस देण्यास सिरम तयार होती, पण मोदी सरकारने...
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात भाजप पुण्यातही बहुमत गमावणार | गिरीश बापट यांना पुढे करण्याची रणनीती?
विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाने काबीज केलेल्या पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण भारतीय जनता पक्षाकडूनच करण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | पुणे जिल्हा बँकेत 356 क्लार्क पदांसाठी भरती | असा ऑनलाईन अर्ज करा
पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करतायेणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे. (PDCC Bank Recruitment 2021 Free Job Alert)
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा | कोरोना निर्बंधात मोठे बदल
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...त्यापेक्षा अमृता वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम करावं - रुपाली चाकणकर
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोच्या ‘ट्रायल रन’चं उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंदक्रांत पाटील यांनाही निमंत्रण न दिल्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहे. आता या वादात अमृता फडणवीसांनी उडी घेतली असून ” काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात” अशा शब्दात पुणे मेट्रोच्या ‘ट्रायल रन’ उद्घाटनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य, सध्या कोणतेही काम नसल्याने भाजपने त्यांना प्रमुख प्रवक्तेपद द्यावं - मनिषा कायंदे
पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुन अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. तसेच कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनिषा कायंदे यांनी भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारचे मला कोणते काम जास्त आवडले तर ते एकत्र येत एकमेकांची पाठ खाजवणे, अशी मिश्किल टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारच्या कामगिरीवर टोला लगावला आहे. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आदी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा
धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यात पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारला टोला लगावला. केवळ चार टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
पतीला वाचवण्यासाठी 'फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे' | ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली - रुपाली चाकणकर
सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसूक केंद्र सरकारबद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपले पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावे लागत आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मागील २ वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरणे स्वीकारले असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, तो ठेवला जातं नाही, पण राज्यपाल त्यासाठी समर्थ आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यपाल तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन हॉस्टेलचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Unlock | मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार | तर पुण्यातील नियमांवरून महापौरांची नाराजी
मुंबईमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत, त्यानुसार मुंबईमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंधांबाबत राज्यासाठी सुधारित आदेश जारी करताना सरकारने मुंबईचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला होता. त्यानुसार आपल्या अधिकारात मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी करत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे. नवे आदेश आजपासून(३ ऑगस्ट) लागू केले जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव | राज्य मागासवर्ग आयोगाचा मोठा निर्णय
मागील काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. एका बाजूला मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राजकीय ओबीसी आरक्षणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात | १-२ दिवसात माझी त्यांच्याशी भेट होणार आहे - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असताना देखील भाजपकडून विरुद्ध संकेत दिले जातं आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON