महत्वाच्या बातम्या
-
पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली
पुण्यातील वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कुणाशीही वैयक्तिक वैर नाही | पण मला मोदी, शहांच्या भूमिका पटत नाहीत - राज ठाकरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेच्या महा बजेटमधील पैसा जातोय कुठे? | माहिती घेऊन भाजपाची पोलखोल करा - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ते संपूर्ण पक्षकार्याचा आढावा घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पत्रकार फोटोग्राफरकडून राज यांचे वारंवार फोटोज | राज गमतीने म्हणाले 'मी काय कुंद्रा आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर बैठका आणि पक्ष बळकटीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत चर्चा देखील सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला मूळ विषयावर केंद्रित असलेले राज ठाकरे पत्रकारांसोबत वेळ खर्ची घालताना दिसत नसल्याने अनेक पत्रकारांच्या रिपोर्टींग संदर्भात अडचण होतं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात असं पथक स्थापन करणारा मनसे हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक सामान्य लोकांच्या प्रशासनाच्या मदतीला येईल.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात
पूढील वर्षी होणाऱ्या पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सलग ३ दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार? | धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त - आ. मिटकरी
पुण्यातील काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होत होती. समाज माध्यमांवर त्यांच्या होर्डींगचा फोटोही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका होर्डिंगवरून ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवलेल्या जबाबामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा | जबाबात काय?
राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या मिटण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे पूजाच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब. कारण, आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत | स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - एकनाथ शिंदे
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर सर्वच बाजूनी संकट कोसळलं होतं. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा उद्या निकाल लागणार | असा ऑनलाईन चेक करा
राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
4 वर्षांपूर्वी -
OBC आणि मराठा आरक्षण | एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
4 वर्षांपूर्वी -
मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय - राज ठाकरे
भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्र्वादीत जाहीर प्रवेश करताना माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी CD बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेचं सावट असताना पुणेकरांकडून कोरोना नियम धाब्यावर | लहान मुलांसहित भुशी डॅमवर गर्दी
कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत असली तरही रुग्ण संख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका अद्यापही कायम आहे. यासाठी राज्य सरकारने निर्बंधांमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यामध्ये पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी दिले आहेत. तरीही सुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे. आज भुशी डॅम येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित भाईंकडे काही गोष्टी गेल्यानंतर अनेकांना कापरे भरते - देवेंद्र फडणवीस
अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल
कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.
4 वर्षांपूर्वी -
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले - रुपाली चाकणकर
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय धक्का बसला होता. कारण राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला होता. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हायकोर्टात गेले होते. आनंदराव अडसूळांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC