21 April 2025 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

सलग ५ वर्ष ५ महिने सत्तेत तरी मोदी पुणेकरांना म्हणाले, 'सत्तेत येऊन ५ महिने झाले'

PM Narendra Modi, Maharashtra Vidhansabha Election 2019

पुणे: पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.

विशेष म्हणजे मागील ५ वर्षात भाजपने पुण्यात कोणती विकासाची कामं केली याचा कोणताही हिसाब त्यांनी पुणेकरांना दिला नाही. त्यात भाजपच्या पुण्यातील खासदार आणि आमदारांची विकासाची कामं सांगावी असं काहीच नसल्याने मोदींनी ५ महिन्याचं सरकार असल्याचं सांगून पळवाट काढल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे कलम ३७० विषयावर मोदी बोलणार आणि त्यासाठी मोदी-मोदी-मोदी असं ओरडून प्रसार माध्यमांवर वातावरण निर्मिती करणारी इव्हेन्ट टीम आधीच सज्ज करण्यात आली होती. असाच प्रयोग २०१४ भाजपने केला होता आणि त्यालाच नेमकी पुणेकर मंडळी भुलली होती. मात्र प्रत्यक्षात सरकार आल्यावर पुण्यात मागील ५ वर्ष जैसे थे परिस्थिती आहे. किंबहुना शहरात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची पूर्वी पेक्षा अधिक वाईट स्थिती असल्याचं अनेक पुणेकर सांगतात.

मोदी सभेत म्हणाले की, मागील ७० वर्षांपासून ‘एक देश, एक संविधाना’च्या आड ३७० कलम येत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या गप्पा खूप झाल्या. पण कृती कोणी केली नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणताच मोदी मोदीचा जयघोष केला. लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले. पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

३७० कलम काढून टाकल्याने देश एकसंध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले, तसेच हे कलम काढून टाकणे जम्मू काश्मीर, लढाखच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते असेही ते म्हणाले. मोदींचे आगमन होताच भव्य हाराच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थित नागरिकांनी मोदींना अभिवादन केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या