21 November 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

Pune Modi Temple | देव चोरीला गेला, पेट्रोल-गॅस दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? राष्ट्रवादीचा सवाल

PM Narendra Modi

पुणे, १९ ऑगस्ट | पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने देवच चोरीला गेल्याने आंदोलन (PM Narendra Modi temple Pune NCP protest on petrol price hike after statue moved) :

दरम्यान, रात्रीपासून पंतप्रधान मोदींची मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने देवच चोरीला गेल्याने आंदोलन केल्या जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? असे म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केले. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला होता.

पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश:
औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.

भाजपाने संबंध नसल्याचं केलं होतं स्पष्ट:
पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi temple Pune NCP protest on petrol price hike after statue moved news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x