15 January 2025 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

बोरघाटात खासगी बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

Bus Accident, Mumbai Pune Highway Borghat

खंडाळा: दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा गारमाळ इथे भरधाव खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र वळणावरून बस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा कराड इथून ही खाजगी बस मुंबईकडे जात असताना दुर्घटना घडली. अपघातामध्ये बसमधील सीट तुटल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले तर चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखींमध्ये दोन महिला एक पुरुष तर एक दोन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. अपघातानंतर ३० ते ३५ जखमींना तळेगाव, निगडी, पनवेल, तसेच खोपोली येथील विविध रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये एका अडीच वर्षीय बालकासह, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. सर्वज्ञा सचिन थोरात (वय २- कराड), स्नेहा पाटील (वय-१५, घाटकोपर), जनार्दन पाटील (वय-४५), संजय शिवाजी राक्षे (वय-५०, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले.

दिवाळीच्या सुट्ट्या संपून आजपासून बऱ्याच शाळा आणि ऑफिस सुरु होणार आहेत, त्यामुळे सुट्टीसाठी गावी गेलेल्या आणि कामासाठी परतत असणाऱ्या प्रवाशांचा यात जास्त सहभाग होता. मृतांमध्ये तीन महिन्यांची चिमुकली आणि १५ वर्षांची एक विद्यार्थिनी होती, याच विद्यार्थिनीच्या वडीलांचाही मृतांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x