लॉकडाउनमुळे ९ चिनी अधिकारी पुण्यात अडकले, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई, १९ जून : महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतेय. काल (गुरुवारी) एका दिवसात राज्यात कोरोनाच्या 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 751 इतका झाला आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. पुण्यात काल दिवसभरात 573 नवे रुग्ण आढळल्याने येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजार 810वर पोहोचला आहे. तर एका दिवसात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने येथील कोरोनाबळींची संख्या 552 इतकी झाली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पुण्यात कोरोनाच्या सर्वाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातच चाकन येथील एका कंपनीतील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका चिनी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. चाकनमधील चिनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर, त्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी यातील 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, आता १३० कर्मचाऱ्यांमध्ये ९ चिनी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती खेड तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व कर्मचारी पुण्यातील एका चिनी कंपनीत काम करत होते. चाकनमध्ये ही कंपनी असून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्य म्हणजे चिनी अधिकारी २५ मार्चआधीच चाकनमध्ये पाहणी करण्यास आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन आणि विमान प्रवास बंद केल्यानंतर ते इथेच अडकले. गेल्या आठवड्यात एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळं संपूर्ण कंपनी सील करण्यात आली असून, 130 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
News English Summary: After some employees of a Chinese company in Chakan showed symptoms of corona, they were tested. On Thursday, the reports of 7 of them came back positive. Meanwhile, it now has 130 employees, including 9 Chinese officials
News English Title: Pune Chakan seven employees of Chinese firm are corona positive including Chinese personnel News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY