3 January 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

पुणे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेंचं नगरसेवक पद रद्द । मनसे उमेदवाराच्या न्यायालयीन लढ्याला यश

Corporator Avinash Bagwe

पुणे, ०३ जुलै | पुणे महापालिकेच्या हद्दीत एक महत्वाची घटना घडली आहे. पुण्यातील लोहियानगर कासेवाडी प्रभागातील कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. तसे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे. या प्रकरणी मनसेचे उमेदवार राहिलेले भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यावर निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, नगरसेवक अविनाश बागवे या निकालाविरोधात 17 जुलैला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे.

अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव आहेत. ते पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 अ मधून निवडून आले होते. 4 फेब्रुवारी 2017 रोजी मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी करताना त्यात विसंगत आणि खोटी माहिती दिल्याची तक्रार केली. मात्र, यावर कोर्टाचा आदेश नसल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळली. त्यानंतर अविनाश बागवे निवडणुकीत विजयी झाले.

मनसे नेत्यामुळे नगरसेवक पद गेलं?
पुणे महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत लोहियावगर-कासेवाडी या प्रभाग क्र १९ अ मधून अविनाश बागवे यांनी निवडणूक लढवली होती. अॅड भुपेंद्र शेडगे यांनीही मनसेकडून निवडणूक लढवली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी बागवे यांनी प्रतिज्ञापत्र आणि नामनिर्देशन पत्रात विसंगत, अपुर्ण, खोटी माहिती दिल्याचं सांगत शेडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे आक्षेप नोदवला होता. परंतु, त्यांचा आक्षेप तेव्हा फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे शेडगे यंनी मुख्य लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेबाबत झालेली साक्ष, पुरावे, उलटतपासणी या सगळ्याचा विचार करुन न्यायालयाच्या तरतुदींच्या आधारे न्यायालयाने अविनाश बागवे यांचं पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं बागवे यांनी सांगितलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune Congress corporator Avinash Bagwe lost his position in Pune news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x