16 April 2025 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस | रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

Pune, MLC Election, MNS candidate Rupali Patil Thombre, Threatened with death

पुणे, २१ नोव्हेंबर: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आमदार होण्याची स्वप्नं पाहू नकोस, मारुन टाकीन, अशा शब्दात साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वत्र प्रचाराची धामधुम असतानाच रुपाली पाटील यांना सातारा येथील लबाडे अडनाव असलेल्या व्यक्तीनं फोनवरुन धमकी दिल्यानं निवडणुकांमधला तणाव वाढला आहे. ‘आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस, जिथे असशील तिथे येऊन संपवू,’ अशी धमकी रुपाली यांना देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणानंतर रुपाली पाटील यांनी पोलिसांत धाव घेत संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला खुलं आव्हानही दिलं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या मतदारसंघातून यापुर्वी दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. तर याच दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना सातारा येथून लबाडे या व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या धमकीच्या फोनमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena candidate from Pune graduate constituency Rupali Patil Thombre has been threatened with death. Don’t dream of becoming an MLA, I will kill you, an unknown person has threatened to kill Patil by calling from Satara. Rupali Patil has lodged a complaint with Pune Police against the unknown. Rupali Patil has also demanded the Pune police to arrest the intimidator.

News English Title: Pune MLC Election MNS candidate Rupali Patil Thombre got threatened with death News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या