पुणे महापालिका निवडणुक २०२२ | भाजपसाठी हा पराभव भविष्यातील धोक्याची नांदी?
पुणे, ५ डिसेंबर : राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेले यश अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे ठरते. तर बालेकिल्ल्यातच भारतीय जनता पक्षाच्या पदरी पडलेली निराशा पक्षाला पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून या मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर अखेर विजयी झाले आहेत. ३४ व्या बाद फेरीत जयंत आसगावकर विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे.
पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून एक अपवाद वगळता पुणे विभागात ३६ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडीने पराभवाची धूळ चारली आहे. अरुण लाड यांच्या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शह दिला, तसेच गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टेही काढले. सत्तेत आल्यानंतर प्रथमच मिळालेल्या यशाने राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण आणखी घट्ट करण्यास मदत झाली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंती क्रमांकाची तब्बल १ लाख २२ हजार १४५ मते मिळवत, महाविकास आघाडीच्या अरुण गणपती लाड यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी ४८ हजार ८२४ मतांनी भारतीय जनता पक्षाच्या संग्राम देशमुख यांचा सहज पराभव केला. पुण्यातील दोन्ही जागांवर झालेला पराभव भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागणारा आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे जयंत आसगावकर यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी ३३ फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी २५ हजार ९८५ मते घेतल्याने अखेर तब्बल ३६ तासानंतर विजय निश्चित झाला.
निकालाचा कल पाहता पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाचे देशमुख यांना फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले. देशमुख यांना अवघ्या ७३ हजार ३२१ मतांवर समाधान मानावे लागले. या मतांमध्ये पुण्यातील पारंपरिक मते असली, तरी देशमुख यांचा अन्य जिल्ह्यांतही निभाव लागला नाही. पालिका निवडणुकीवर परिणाम? पुणे महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहेत. महापालिका निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होत असल्या, तरी या निकालाचा परिणाम हा महापालिकेच्या निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुण्यात आणखी २३ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही प्रमाणात काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी हा पराभव भविष्यातील ही धोक्याची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
News English Summary: With one exception, the Bharatiya Janata Party (BJP), which has dominated the Pune division for 36 years since the formation of the graduate constituency, has been defeated by the Mahavikas Aghadi. On the occasion of Arun Lad’s victory, NCP state president Jayant Patil gave his support to Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil. The success achieved for the first time since coming to power has helped to tighten the equation of the Mahavikas Aghadi in the state.
News English Title: Pune Municipal corporation election 2022 alert for Maharashtra BJP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS