24 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात भाजप पुण्यातही बहुमत गमावणार | गिरीश बापट यांना पुढे करण्याची रणनीती?

Pune Municipal Corporation Survey 2022

पुणे, १२ ऑगस्ट | विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाने काबीज केलेल्या पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण भारतीय जनता पक्षाकडूनच करण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होतं. मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त ७५ ते ८० जागांवरच विजय मिळण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. २०१४ पासून भारतीय जनता पक्षानं राज्यात ठिकठिकाणी पाय रोवण्यास सुरूवात केली होती. पुणे महापालिकेतही मागील निवडणुकीत घवघवीत यश भारतीय जनता पक्षानं संपादन केले होते.

परिणामी सत्ताधारी भाजपने महापालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे. महापालिका निवडणूक ही खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेलं आहे. कोरोना आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता फक्त सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल:

भाजप 99
काँग्रेस 09
राष्ट्रवादी 44
मनसे 2
सेना 9
एमआयएम 1
एकूण 164

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune Municipal Corporation Survey 2022 BJP may lost majority news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x