5 November 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

पुण्यात भाजपचा 'वन वे पराभव' | प्रदेशाध्यक्षांच्या नैत्रुत्वात पुणे हातचं गेलं

Pune, NCP candidate Arun Lad, Graduate constituency election

पुणे, ४ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले (Pune NCP candidate Arun Lad wins graduate constituency election 2020) आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विजयासाठी एक लाख १३ हजार पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. लाड यांनी पहिल्या फेरीतच एक लाख २२ हजार १४५ मते घेत विजय मिळविला.

भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख (Pune BJP candidate Sangram Deshmukh graduate constituency) यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार ३२१ मते मिळाली. त्यामुळे ४८ हजार ८२४ मतांनी लाड यांनी विजय संपादन केला. या विजयामुळे भारतीय जनता पक्ष धक्का बसला आहे. पुणे आणि नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भारतीय जनता पक्षाकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

 

News English Summary: In the Pune graduate constituency, Arun Lad of Mahavikas Aghadi has won. He was the Bharatiya Janata Party candidate in this constituency with a total of 62 candidates. Two lakh 47 thousand 50 voters had exercised their right to vote in five districts namely Pune, Kolhapur, Satara, Sangli and Solapur. A quota of one lakh 13 thousand first preference votes was fixed for victory. Lad won the first round with 1 lakh 22 thousand 145 votes.

News English Title: Pune NCP candidate Arun Lad wins graduate constituency election 2020 News updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x