28 January 2025 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Pune Narendra Modi Temple | नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली | कारण...

PM Narendra Modi

पुणे, १९ ऑगस्ट | पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंडे नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. परंतु आता मात्र या मंदिरातील मोदींची मूर्ती इतर ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीतून ही मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे..ही मूर्ती एका नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश:
औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.

भाजपाने संबंध नसल्याचं केलं होतं स्पष्ट:
पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.

मोदींचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते (Pune PM Narendra Modi temple in controversy) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे, अशा व्यक्तिमत्त्वाचे मंदिर नक्कीच समाजातील व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. समाजात राहताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी जे काही करत आहेत, ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचे शिल्प का उभारले जाऊ नये, अशी भावना नागरिकांची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते. ते भारताचे खरे हिरो आहेत, अशी नागरिकांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान आता या मंदिरातील मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. या मागचे कारण अद्याप समजले नाही.तर चेन्नईच्या त्रिचीमध्ये एका शेतकऱ्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. या शेतकऱ्याने आपल्या स्वत:च्या पैशाने हे मंदिर तयार केले होते. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने हे मंदिर तयार केले. ती जमिनही शेतकऱ्याची होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune PM Narendra Modi temple in controversy news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x