15 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

पुणे पीएमपीएमएल’ची सेवा ३ सप्टेंबर पासून सुरू होणार | महापौरांची माहिती

Pune PMPML Service, Mayor Murlidhar Mohol, Unlock

पुणे, २० ऑगस्ट : कोरोना विषाणूंची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, मागील पाच महिन्यांपासून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे पीएमपीएमएल बंद ठेवण्यात आली होती. आता पुणे शहरात पीएमपीएमएल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (गुरुवार) दिली.

पुणे आणि पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पुणे महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहर आणि आसपासच्या भागात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. पीएमपीएमएल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन शिथील करण्यात आला. त्यानुसार शहरातील सर्व परिस्थिती पूर्ववत येण्यास मदत झाली आहे. आता शहरातील सर्व नागरिकांचा विचार करता आणि पीएमपीएमएल सुरू करण्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली मागणी, लक्षात घेता आज पुणे महापालिकेत दोन्ही महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात बैठक झाली. त्यामध्ये दीर्घ काळ चर्चा देखील झाली असून पीएमपीएमएल ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ७९ हजार ३७ झाली असून गुरुवारी दिवसभरात १६६९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १३८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८०६ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३१६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४८५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

दिवसभरात ३३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील ०९ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ८८२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६२ हजार ३४९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८०६ झाली आहे.

 

News English Summary: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will restart its services in Pune and Pimpri-Chinchwad from September 3, a couple of days after the Ganesh festival comes to an end. The decision to restart services was taken at a meeting held by PMPML Chairman and Managing Director Rajendra Jagtap, and attended by PMC Commissioner Vikram Kumar and PCMC Commissioner Shravan Hardikar, in Pune on Wednesday.

News English Title: Pune PMPML Service Will Start From September 3 Pune Mayor Mohol News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x