22 January 2025 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

राष्ट्रवादी आणि शिवसेना | नव्या युतीचे संकेत | कारण ठरतील आगामी पालिका निवडणुका

Shivsena, NCP, Pune municipal elections, MP Sanjay Raut

पुणे, २० फेब्रुवारी: राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.

त्याला कारण ठरू शकतात आगामी महानगरपालिका निवडणूक असंच म्हणावं लागेल. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात स्पष्ट केले.

ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले. पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु” असे संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: The formula is to fight the upcoming Pune Municipal Corporation elections together. Shiv Sena and NCP will stay together. Let’s discuss how to accommodate the Congress in it, ”MP Sanjay Raut clarified in Pune today.

News English Title: Shivsena and NCP may contest Pune municipal elections in alliance said MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x