19 February 2025 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या । बुधवार पेठेत तणावाचं वातावरण

Shivsena, Yuva sena, Vibhag Pramukh Dipak Maratkar, killed Pune

पुणे, २ ऑक्टोबर : पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे.

दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा आहे. रात्री दीड वाजता घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यानंतर बुधवार पेठ परिसरात तणावाच वातावरण आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण करुन घराबाहेर बसले होते. यावेळी मोटारसायकलवरुन ५ ते ६ जण आले. त्यांनी तीक्ष्ण हत्याराने दीपक यांच्यावर सपासप वार केले व पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.

 

News English Summary: A sensational case of murder of Yuvasena vibhag Pramukh has come to light in Pune. The name of this vibhag Pramukh is Deepak Maratkar. It is said to have been attacked by four to five people. Deepak Maratkar was killed in the attack.

News English Title: Shivsenas Yuva sena Vibhag Pramukh Dipak Maratkar killed Pune Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x