15 November 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच | ऑनलाईन दर्शनाची सुविधा

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati, Covid 19 pandemic

पुणे, १० ऑगस्ट : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने होत असून सार्वजनिक गणेशोत्सवास सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे, गेल्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडला आहे.

दरवर्षी एखाद्या ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती उभारून त्यात बाप्पा विराजमान व्हायचे. यावर्षी मात्र मांडव किंवा मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही. अतिशय साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.

बाप्पाचं दर्शन होणार ऑनलाईन;
यंदाचा उत्सव मंदिरात साजरा करत असताना भक्तांना बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणें मंदिरात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेता येणार आहे. उत्सवाचे आकर्षण असलेलं महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण, विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात उत्सव साजरा करत असताना आरोग्य विषयक जनजागृती तसेच आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

 

News English Summary: The world famous Dagdusheth Ganpati Trust in Pune has also announced that this year’s Ganeshotsav will be celebrated in the temple itself. Thus, for the first time in the last 127 years of tradition, the volume has fallen.

News English Title: Shrimant Dagdusheth Halwai Ganpati is installed in the temple itself due to Covid 19 pandemic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x