5 November 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

Shivajirao Bhosle co operative bank scam, NCP MLA Anil Bhosle

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक असलेले आमदार अनिल भोसले आणि सूर्याजी जाधव, सीईओ पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काल रात्री (मंगळवार २५ फेब्रुवारी) उशिरा ही कारवाई केली.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण ३०० कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित २२२ कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या एकूण १४ शाखा असून, एकूण १६ हजार खातेदार आहेत. आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या ऑडिटमध्ये ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले होते. हा प्रकार २३ मे २०१९ पूर्वी घडलेला आहे. याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसले दांपत्यासह १६ जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summery: The crime branch, along with the bank’s director and MLA Anil Bhosle, arrested four persons on Tuesday night in connection with the Shivajirao Bhosale Co-operative Bank scam. Bhosale, along with three others, have been charged in the case. The bank has been accused of misappropriating Rs 75 crore and the scope of the misconduct is likely to increase further.

 

Web Title: Story 4 arrested including NCP MLA Anil Bhosle for Shivajirao Bhosle co operative bank misconduct in Pune.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x