15 January 2025 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश

Story Dr Narendra Dabholkar murder case, Norwegian divers recover pistol

पुणे: सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरबी समुद्राच्या तळातून एक पिस्तूल शोधून काढले आहे. हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, CBI ने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आलं आहे. हे पिस्तूल खरंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे. ऑगस्ट 2019 मध्ये एजन्सीनं पुणे कोर्टाला माहिती दिली की, ठाण्याजवळील खारेगाव इथं नदीतून शस्त्रं शोधणं आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सीबीआयनं 7 जणांची नावं दिली होती.

हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.

2013 पासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पिस्तुल सापडल्यामुळे सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. तपास आता पुढे सरकला असून लवकरच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सीबीआयने दाभोलकर हत्येप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती.

 

News English Summery: Another important evidence has come in the investigation of the Central Investigation Department for the murder of Narendra Dabholkar, a social activist and founder of the superstition eradication committee. CBI officials have recovered a pistol from the bottom of the Arabian Sea. Authorities say the same pistol was used to kill Dabholkar. Swimming in the sea by Norwegian swimmers discovered the pistol from the bottom of the Arabian Sea. According to the information received, the CBI has sent the pistol for forensic examination. Whether the pistol was actually used to assassinate Dabholkar is currently under investigation. In August 2019, the agency informed the Pune court that it was necessary to find weapons from the river at Kharegaon near Thane. The CBI had named seven persons as the main accused in the case.

 

Web News Title: Story Dr Narendra Dabholkar murder case Norwegian divers recover pistol from seabed.

हॅशटॅग्स

#Pune Murder(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x