आता बस्स! प्रचंड गोष्टी सहन केल्या, तु ये काळं फासायला मग तुझं?...रुपाली पाटील संतापल्या

शिर्डी : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
मात्र सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी व्यक्त केली आहे.
इंदुरीकर महाराज यांनी माफीनामा जारी करत ही माफी मागितली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केलं होतं. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांवर जेवढी टीका झाले त्यांच्या कित्येकपट टीका सध्या तृप्ती देसाई यांच्यावर समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. त्यात भर पडली आहे ती तृप्ती देसाई यांनी थेट इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फसण्याची भाषा केल्याने मनसेच्या पुण्यातील पदाधिकारी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील तुप्ती देसाई यांना सज्जड इशारा दिला आहे. कायद्याने जे करता येईल ते नक्कीच करा असं रुपाली पाटील यांचं पहिल्यापासून म्हणणं आहे, त्यात न्यायालयात जायचं असेल तर तो देखील अधिकार आहे असं त्या पहिल्या दिवसापासून बोलत आहेत. मात्र एखादा विषयाची आणि व्यक्तीची दुसरी बाजू समजून न घेता हा विषय किती चिघळावा याला देखील एक मर्यादा आहे असं रुपाली पाटील टीव्ही वाहिन्यांवरील चर्चा सत्रामध्ये सांगत आहेत. मात्र आता ४ दिवसात गुन्हा नोंदवला गेला नाही तर इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फासण्याची भाषा केल्याने रुपाली पाटील चांगल्याच संतापल्या आहेत.
याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, समाजातील वाईट प्रवृत्तीविषयी इंदोरीकर महाराजांनी अनेकदा प्रबोधन केलं. इंदोरीकर महाराजांनी अनेकांचे संसार बसवले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. मात्र आज काही शूर्पणखा महिलेने चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला आहे. ते अत्यंत निंदणीय आहे तसेच स्त्री असण्याचा गैरफायदा आहे असं सांगत तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे.
तसेच या शूर्पणखा महिलेला आव्हान आहे की, तु ये काळं फासायचं प्रयत्न कर मग तुझं नाक कसं कापायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. मग ते काळं कोणाच्या तोंडाला लागेल हे उघड्या डोळ्यानं पाहता येईल. त्यामुळे आता बस्स, प्रचंड गोष्टी सहन केल्या, स्त्री म्हणून कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही, त्यामुळे तिच्यामुळे समस्त स्त्री वर्ग नाहक बदनाम होत आहे असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ मनसेनेही इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ या प्रकरणात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय.
Web Title: Story MNS party leader Rupali Patil Thombre warns Trupti Desai over statement on Indurikar Maharaj while then.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON