टीकेची पातळी घसरली; मिटकरींकडून पोंक्षेवर थेट आजारपणावरून बोचरी टीका
पुणे: दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू म्हणाले की, “मी सावरकर या कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून या ठिकाणी यापुर्वी अनेक वक्ते आले आहेत. यंदाच्या वर्षी शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले असून ते त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत. मात्र या कार्यक्रमापुर्वी काही संघटनांकडून सावरकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे आम्ही खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांना सांगितलं होते”.
सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे, असा थेट सवाल यावेळी पोंक्षे यांनी केला होता. सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्नाचाच सन्मान ठरेल, असे नमूद करताना सावरकरांना भारतरत्न म्हणायला सुरुवात करा, असे आवाहन पोंक्षे यांनी केले यावेळी केले होते.
मात्र पोंक्षे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार शब्दात टीका केली आहे. थेट पोंक्षे यांचं नाव घेत त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.
पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.
— Amol mitkari (@amolmitkari22) March 1, 2020
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून शरद पोंक्षे मनोरंजनसृष्टीतून लांब गेले होते. त्यांचा अचानकपणे कलाविश्वातील वावर असा कमी झाल्यामुळे चाहत्यांना प्रश्न अनेकांना पडले होते. मात्र डिसेंबरपासून कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे त्यांना कलाविश्वापासून दूर जावं लागलं होतं. मात्र या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ते ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा आले होते. मात्र मिटकरींनी राजकीय टीका करून समाधान मानानं अपेक्षित असताना त्यांनी त्यांच्या या गंभीर आजारावरूनच पोक्षेंवर टीका केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
News English Summery: Event organizer Ranjit Natu said, “I am in the third year of this program and this year there have been many speakers. This year, Sharad Ponkshe has been invited and he will be presenting his thoughts on this place. However, before the event, some organizations had announced a protest against Savarkar. We told them that it would not be consumed ”. Ponkshe had directly questioned why the government is waiting for Savarkar to give Bharat Ratna. Ponkshe had appealed that Savarkar should be called Bharat Ratna, saying that giving Bharat Ratna to Savarkar would be an honor of Bharat Ratna. However, NCP leader Amol Mitkari has strongly criticized Ponkshe. Taking the name of Ponkshe directly, he said in a tweet, “Ponkshe, Makatma Fule has saved many of your generations. Your tendency to hate Mahatma Fule and bad tendency does not go away. It is felt that the illness has affected the head. Take the medicine on time. Not that it affects the brain.
News English Title: Story NCP Leader Amol Mitkari criticized Sharad Ponkshe over his personal health issue.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार