21 December 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

एल्गार परिषद: पवारांना तत्कालीन युती सरकारच्या भूमिकेवर संशय; युतीतल्या सेनेचा विसर?

Story NCP President Sharad Pawar, BJP Shivsena Yuti Government, Elgar Parishad Case

मुंबई: भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.

‘भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमासाठी लोक कोरेगावात येतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. पण यामध्ये संभाजी भिडे आणि अनिक एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं. त्यावेळी नक्की काय झालं हे बाहेर येईन’ असं शरद पावर म्हणाले.

दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईल, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणी संबंध नसलेल्या लोकांना वर्ष २ वर्ष तुरूंगात टाकाण्यात आलं. त्यांना हवा तसा न्याय मिळालेला नाही. कोणत्याही न्यायालयात जामीन मिळाला नाही. तत्कालिन राज्य सरकारनं दिलेली माहिती पूर्ण सत्य नाही. पण, ती अशा पद्धतीनं दिली गेली की, जामीन मिळाला नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानंही याची स्वतंत्र चौकशी करावी असं म्हटलं आहे. तिच भूमिका आमची आहे. आमची तक्रार पोलिसांच्या भूमिकेविषयी आहे. पुणे पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर तुरूंगात असलेले लोक बाहेर यावे म्हणून मी प्रयत्न करतोय,” असं पवार म्हणाले.

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा घटनांसंदर्भात शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,”एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असं आरोप पवार यांनी केला.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar raised question over previous BJP Shivsena Yuti Government over Elgar Parishad Case.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x