23 December 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा
x

पुणे: भोंदू बाबाकडून ५ बहिणींचं लैंगिक शोषण, पूजेच्या नावाखाली मुलींना नग्न करायचा

Rape in Pune Pimpri, Bhondu Baba

पिंपरी चिंचवड (पुणे) : अघोरी प्रथा आणि जादूटोणाकरून पैसे उकळण्याचे आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पुजेच्या नावाखाळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात धेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं असं धक्कादायक प्रकार तो करायचे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेलं गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्यानं एका भोंदू बाबानं एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रथम एका मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आई वडिलांना माझ्या देवी शक्तीने आणि काळया जादूने मारुन टाकेन अशी धमकी दिली. उतारा काढताना त्याने या मुलीसोबत तीनदा बलात्कार केला. तसंच इतर बहिणींवरही बलात्कार केला असे फिर्यादीने सांगितले आहे. आता याप्रकरणी या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

News English Summery: You may have listened many instances of aggression and witchcraft and women abuse. One such shocking kind has surfaced in Pimpri Chinchwad, Pune. Police have arrested a Bhondu Baba who tortured women in the name of Puja. Police have said that he wanted to do a shocking thing for women to be naked and rub lemons on their bodies.

 

Web Title: Story Pune Pimpri police arrested a Man for sexual harassment of 5 sisters.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x