17 September 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

JNU हल्ला: मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात विद्यार्थ्यांची पोस्टरबाजी

JNU, PM Narendra Modi, Amit Shah

पुणे: जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केलेले फोटो हाती पकडले होते. सुरक्षित शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी दाखवले. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.

तत्पूर्वी जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

 

Web Title:  Students Protest against Prime Minister Narendra Modi and Amit Shah over JNU attack.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x