28 January 2025 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

श्रावगी'ज किचन - सोयाबीन चिली

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. उकळत्या पाण्यात सोयाबीन टाकून गॅस बंद करा.
  2. दहा मिनिटे झाकून ठेवा.नंतर त्यात थंड पाणी टाका.
  3. सोयाबीन मधील पाणी दाबून काढून टाका.
  4. सोयाबीनमधे मीठ, तिखट,शेजवान सॉस,आणि एक चमचा काॅर्न फ्लोअर टाकून नीट मिक्स करून घ्या आणि ३० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  5. ३० मिनिटांनंतर फ्रायपॅनमध्ये ३ चमचे तेल गरम करून घ्या, त्यात मेरिनेट केलेलं सोयाबीन टाका आणि साधारणपणे १० मिनिटे परता सोयाबीन कुरकुरीत होईपर्यंत.
  6. आता दुसऱ्या कढईत हाय गॅसवर २ चमचे तेल गरम करावे, बारीक चिरलेला लसूण, आलं टाका आणि एक मिनिट परतावे.
  7. कांदा , सिमला मिरची टाकून परतवा, चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून एक मिनिट शिजवावे.
  8. लाल तिखट,सगळे साॅस टाकून नीट मिक्स करावे.
  9. एक चमचा काॅर्न फ्लोअरमधे ४ चमचे पाणी घालून ते मिश्रण नीट मिक्स करावे, गाठ रहाता कामा नये.
  10. ते मिश्रण कढईत टाकून नीट हलवावे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालून ते मिश्रण हलवून त्यात सोयाबीन टाकून मिक्स करावे आणि एक मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी आणि वरून थोडी कांदा पात घालून सोयाबीन चिली गरमागरम सर्व्ह करावी.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • सोयाबीन १०० ग्राम (Soyabean 100 gm)
  • कॉर्न फ्लोअर ३मोठे चमचे (Corn flour 3 tbs)
  • लाल तिखट २ चमचे (Red chilly powder 2 tsp)
  • शेजवान सॉस ३ चमचे (Shenzhen souse 3 tbs)
  • तेल ५ चमचे (Oil ५ tbs)
  • बारीक चिरलेला लसूण १२/१५ पाकळ्या (Chopped garlic cloves 12/15)
  • बारीक चिरलेलं आलं १” (Chopped ginger 1″)
  • जाड चिरलेला कांदा अर्धी वाटी (Onion half bowl)
  • चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी (Capsicum half bowl)
  • मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
  • रेड चिली सॉस १ चमचा (Red chilly sauce 1 tbs)
  • ग्रीन चिली सॉस १ चमचा (Green chilly sauce 1 tbs)
  • टोमॅटो सॉस २ चमचे (Tomato sauce 2 tbs)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x