पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गॅस सुरू करून भांड्यामध्ये 3 वाटी पाणी, एक चिमूट मीठ आणि १ चमचा साजूक तुप घालून पाणी उकळण्यास ठेवावे.
- त्यानंतर पाणी उकळले की, गॅस बारीक करून त्यामध्ये 3 वाटी तांदळाचे पीठ घालून मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ आणावी व थोडे वाफलले की गँस बंद करून ते थंड होण्यास ठेवावे.
- सारण बनवण्यासाठी गॅस सुरू करून एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे खसखस घालून परतून . त्यामधे गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून गुळ वितळून घ्यावा त्यानंतर त्यामधे किसलेले ओले खोबरे वेलची पावडर व चिमूठभर मीठ घालून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.
- उकड थंड झाली की परातीमध्ये उकड काढून घ्यावी हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी वाटी मध्ये पाणी आणि वाटीत थोडे तुप घ्यावे. उकड मळताना तुप आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
- उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. अश्याप्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.
- मोदक वाफवण्यासाठी गॅस सुरू करून कुकर मध्ये थोडे पाणी घालून व त्यावरती चाळणीला थोडे तेल लावून पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
- पाणी उकळले की त्या चाळणी मध्ये जितके बसतील तितके मोदक ठेवावेत व त्यावरती झाकण ठेवून 12-15 मिनिट वाफ काढून घ्यावी. अश्याप्रकारे सर्व मोदक उकडून घ्यावेत व गॅस बंद करावा.
- गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
टीप:
- आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकता.
- हळदीच्या पानांमध्ये उकडीचे मोदक वाफवून घेतल्यास मोदकांचा स्वाद छान येतो.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 3 वाटी तांदळाचे पीठ (3 cup rice flour)
- 3 वाटी पाणी (3 cup water)
- 2 चमचे खसखस (2 tbsp poppy seeds)
- दीड वाटी गुळ (1 and half cup jaggery)
- 3 वाटी किसलेले ओले खोबरे (3 cup grated wet coconut )
- 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp cardamom powder)
- 2-3 चमचे साजूक तुप (2-3 tbsp ghee)
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC