28 January 2025 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

सुप्रिया'ज किचन - मटकी पुलाव

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून नॉनस्टिक कुकर मध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामधे तमालपत्र, दालचिनी आणि वेलची घालून मिक्स करावे.
  2. त्यानंतर त्यामधे पाणी घालून घ्यावे व लिंबू पिळून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालून उकळी आणून घ्यावे. त्यानंतर त्यामधे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालून ते मिक्स करून घ्यावे. 10-12 मिनीट झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवावे. भात शिजल्यानंतर गॅस बंद करून तो दुसर्‍या भांड्यामध्ये काढून घ्यावे.
  3. आता पुन्हा गॅस सुरू करून कुकर मध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामधे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला बटाटा घालून फ्राय करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे अर्धा चमचा साखर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि मटकी घालून 2-3 मिनीट परतून घ्यावे.
  4. त्यानंतर त्यामधे आले लसुण पेस्ट, पुलाव मसाला, लाल मिरची पावडर, थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे व 5 मिनिट शिजू द्यावे .
  5. त्यानंतर त्यामधे शिजवलेला भात घालून मसाला मध्ये मिक्स करून घ्यावे. वरुण फ्राय कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून2 मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी.
  6. मटकी पुलाव खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 1 मोठी वाटी मटकी (1 cup Mat bean)
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
  • 1 बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
  • 1 मोठी वाटी बासमती तांदूळ ( 1 big cup Basmati rice)
  • अर्धा लिंबू (half Leamon )
  • अर्धा चमचा साखर (1/2 tbsp Sugar)
  • 3 वेलची (3 Cardamon)
  • 2 दालचिनी (2 Cinnamon )
  • 2 तमालपत्र (2 Bay leaf)
  • 1 चमचा पुलाव मसाला (1 tbsp Pulao masala)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर (chopped Coriander )
  • 2 बारीक चिरलेल्या हिरवी मिरच्या (2 chopped Green chilli)
  • आवश्यकतेनुसार पाणी( Required Water)
  • 1 बारीक चिरलेला बटाटा(1 chopped Potato)
  • 1 चमचा लाल मिरची पावडर(1 tbsp Red chilli powder )
  • 1 चमचा आले – लसुण पेस्ट (1 tbsp Ginger-garlic paste)
  • 1 वाटी फ्राय केलेला कांदा (1 cup fry onion)
  • 4-5 चमचे तेल (4-5 tbsp Oil)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x