16 April 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

सुप्रिया'ज किचन - गव्हाच्या पिठाच्या कणकेचे मोदक, गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम परातीमध्ये गव्हाचे पिठ ,थोडेसे मीठ आणि पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी .
  2. सारण बनवण्यासाठी गॅस सुरू करून एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे खसखस घालून परतून . त्यामधे गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून गुळ वितळून घ्यावा त्यानंतर त्यामधे किसलेले ओले खोबरे वेलची पावडर व चिमूठभर मीठ घालून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.
  3. ४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.
  4. कणीक व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारी इतके गोळे करून लाटून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. अश्याप्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.
  5. मोदक वाफवण्यासाठी गॅस सुरू करून कुकर मध्ये थोडे पाणी घालून व त्यावरती चाळणीला थोडे तेल लावून पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
  6. पाणी उकळले की त्या चाळणी मध्ये जितके बसतील तितके मोदक ठेवावेत व त्यावरती झाकण ठेवून 12-15 मिनिट वाफ काढून घ्यावी.
  7. अश्याप्रकारे सर्व मोदक उकडून घ्यावेत व गॅस बंद करावा.
  8. गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून गरमागरम मोदक खावेत.

टीप:
१) आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकता.
2) हळदीच्या पानांमध्ये उकडीचे मोदक वाफवून घेतल्यास मोदकांचा स्वाद छान येतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 1 वाटी गव्हाचे पिठाचे कणीक (3 cup wheat flour dough)
  • गव्हाचे पिठ (wheat flour)
  • पाणी (Required water)
  • 1 वाटी सारण (1 cup Saran)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या