21 December 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC Gold Rate Today | खुशखबर, लग्नाच्या हंगामात आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार आणि महागाई भत्ता लवकरच वाढणार, अपडेट जाणून घ्या
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - रवा वडा रेसिपी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. एका भांड्यात एक वाटी रवा घ्यावा, नंतर त्यात अर्धी वाटी दही घालावे व थोडे थोडे पाणी घालून मिक्स करावे
  2. मिश्रण जास्त पातळ बनवायचं नाही व झाकण ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवावे
  3. अर्ध्या तासा नंतर रवा छान भिजतो आणि रवा भिजल्यावर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यावे
  4. नंतर रव्याच्या मिश्रणात सोडा, चवीनुसार मीठ, जिरे, हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कडीपत्ता, सर्व सामग्री घालून मिक्स करावे
  5. तेल तापण्यासाठी ठेवावे
  6. नंतर हाताला तेल लावून घ्यावे व थोडे रव्याचे मिश्रण हातावर घेऊन त्याचा वडा बनवावा व मधोमध बोटाने होल पाडावे मेदू वड्या सारखा वडा बनवावा
  7. तेल गरम झाल्यावर गॅस बारीक करुन वडे तळण्यासाठी सोडावे व दोन्ही बाजूंनी लालसर – कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यावेत
  8. वडे तळून झाल्यावर तेलातून काढून घ्यावे आणि गॅस बंद करावा
  9. रवा वडा खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ वाटी रवा ( 1 Cup Sooji )
  • १/२ वाटी दही ( 1/2 Cup Curd )
  • १ बारीक चिरलेला कांदा ( 1 Chopped Onion )
  • १ बारीक कापलेली हिरवी मिरची ( 1 Chopped Green chilli )
  • १/२ चमचा जिरे ( 1/2 tsp Cumin seeds )
  • १/४ चमचा सोडा ( 1/4 tsp Soda )
  • २-३ कडीपत्त्याची पाने ( 2-3 Curry leaves )
  • बारीक चिरलेली कोथिंबीर ( Coriander leaves )
  • थोडसं बारीक चिरलेल आलं ( Grated Ginger )
  • मीठ चवीनुसार ( Salt to taste )
  • तळण्यासाठी तेल ( fry to Oil )

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x