6 January 2025 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Relationship | लग्न आणि अपेक्षा | आपण लग्नासाठी एक सजीव माणूस शोधतोय की ATM मशीन? - नक्की वाचा

Over expectations of Indian bride from groom

मुंबई, २९ ऑगस्ट | काही दिवसांपूर्वी घरी ओळखीच्या एक मामी आल्या. त्यानंतर बऱ्याच गप्पा रमल्या. बोलता बोलता त्या सहज आईला म्हणाल्या, ‘तुमच्या सोनलच्याही खूप अपेक्षा आहेत का लग्नाबद्दलच्या? आमच्या प्राजक्ताने तर बाई आम्हाला जेरीस आणले आहे. गोरा आणि उंचच मुलगा हवा, मुंबईतीलाच मुलगा हवा, त्याला भरपूर लाखात पगार हवा. त्याने वर्षातून किमान दोनदा तरी परदेशात फिरायला घेऊन जायला हवे, हनिमूनलाही परदेशच हवा. त्याचा ३-४ बेडरूमचा फ्लॅट किंवा स्वतःचा बंगला असावा. त्याने आमच्या सायलीला भरपूर आणि आजच्या पद्धतीचे दागिने करायला हवेत. घरात सगळ्या कामांना नोकर-चाकर हवेत, पैशांच्या बाबतीतही कसलाच धोका नको आहे तिला. तिला असे तयारच साम्राज्य हवे आहे. मुलाकडे पैसा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आजकाल पैशाशिवाय काहीच नाही,’ असे आणि असेच बरेच काही त्या मामी न थकता आमच्या पालकांशी बोलत होत्या.

लग्न आणि अपेक्षा | आपण लग्नासाठी एक सजीव माणूस शोधतोय की ATM मशीन? – Over expectations of Indian bride from groom is became serious problem :

त्यानंतर आई थोडे हसली आणि त्यांना म्हणाली, ‘मी सुखी आहे याबाबतीत. माझ्या लेकीच्या आणि आमच्याही अशा काहीच मोठ्या आणि जीवघेण्या अपेक्षा नाहीत. आम्हाला फक्त तिला आणि तिच्या कामाला समजून घेणारे, तिचे काम पुढे सुरू ठेवणारे साधेसे कुटुंब हवे आहे. बाकी काही नाही.’ काकू एवढे ऐकून निघून गेल्या. आईने देखील त्यांना थांबवले नाही, कारण माझी घरी यायची वेळ झाली होती. झाला सगळा प्रकार आईकडूनच तिच्या गमतीदार शैलीत ऐकायला मिळाला. आम्ही दोघीही प्रचंड हसलो.

अशा अपेक्षा ऐकून हसावे की रडावे?
या अशा अपेक्षा ऐकून, अनुभवून हसावे की रडावे हा प्रश्न अनेकांना पडतो. परवाच माझ्याच एका मैत्रिणीचे या अशाच अति अपेक्षांच्या यादीमुळे लग्न मोडले. हे आपण का रोखू शकत नाही, याचा त्रास जास्त होतो. लग्नाबद्दल अशा गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणाऱ्या मुली बरेचदा आपल्याच जवळच्या नात्यातील असतात किंवा मैत्रिणी असतात. अशा अपेक्षा ठेवताना, त्यांना स्वतःलाही एकदा माणूस म्हणून तपासून बघावेसे वाटत नाही. अशा अपेक्षा व्यक्त करताना आपणही तेवढ्या समर्थ आहोत का, हेही तपासायला हवे. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही.

एकीकडे भरमसाठ पगार असलेलाच नवरा हवा असणाऱ्या मुलीकडे स्वतःचे उत्पन्नाचे काहीही साधन नसते आणि तरीही तिला ते त्याच्याकडून अपेक्षित असते. आर्थिक बाबतीत आजच्या मुलींना कोणतीही तडजोड करायची नसते किंबहुना कोणतीच रिस्क घ्यायची नसते. त्यांना सगळ्या गोष्टी तयार हव्या असतात. होणाऱ्या नवऱ्याचा सर्व सुखसोयीयुक्त स्वतःचा बंगला/फ्लॅट, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, शिवाय चार चाकी गाडी असे सगळे ठेवल्या ठिकाणी हवे असते. घरात सासू-सासरे नामक इसम नकोच असतात. या मुलींनी घरात फक्त शोभेची बाहुली बनून राहावे, ही तितकीच बेगडी आणि एक माणूस म्हणून स्वतःचीच प्रगती थांबवू पाहणारी अपेक्षा असते. मुलाने प्रचंड पैसा कमवून आणायलाच हवा, असे मुलीच्या घरच्यांनाही वाटत असते. त्यातही त्याचा व्यवसाय नसावा.

नोकरी करणारा लखपती असावा व्यवसाय करणारा नको:
व्यवसायामध्ये आर्थिक चढ-उतार येतात, त्यापेक्षा तो नोकरी करणारा असावा. नोकरी सरकारीच असावी आणि सरकारी नसेल, तर भरमसाठ पैसा मिळवून देणारी असायलाच हवी. आपल्याकडे आजही लग्नासाठी सुयोग्य स्थळ मिळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असेच करिअरचे क्षेत्र निवडण्याचा आग्रह मुला-मुलींना केला जातो. कोणी करिअरची वेगळी वाट निवडली, तर ते लोक समाजबाह्य होतात, वेडे ठरवले जातात. आजही ग्रामीण भागात ७/१२ उतारा बघितल्यानंतरच लग्न ठरवली जातात. मग भले मुलीला त्या घरात दिवसभर आल्यागेलेल्यांची धुणीभांडी करावी लागलीत तरी चालेल. लग्नाच्या बाजारात तुमच्याकडे ‘दाम’ असायलाच हवा. लग्नासाठी मुलाकडे स्वतःची शेती किंवा स्वतःचा कार्पेट एरिया महत्त्वाचा झाला आहे आजच्या परिस्थितीत!

What are the expectations of Indian Brides from their groom :

माहेरी सर्वकाही कर्तृत्ववाने मिळवलं, पण सासरी सर्वकाही रेडिमेड हवं:
एखादी मुलगी लग्नाआधी तिचे संपूर्ण घर कर्तृत्ववान होऊन सांभाळते; पण लग्नानंतर तिला काहीच कष्ट करायचे नसतात. म्हणून मग ती पैशाने श्रीमंत असणारीच स्थळे शोधत असते. तिला सासरी कोणतेही काम करायचे नसते. लग्नानंतर तिच्यातील कष्ट करण्याची प्रवृत्ती संपलेली असते. सध्याचा लग्नाबद्दलचा अजून एक ट्रेंड असा आहे, की कला किंवा सर्जनशील क्षेत्रातला मुलगा नको असतो. या मंडळींना म्हणे ‘सेटल’ व्हायला वेळ लागणार असतो, हे त्यामागचे कारण. माणूस म्हणून त्यांच्याकडे कोणीही बघायला तयार नसते. हे असे ट्रेंड्स फक्त मुलींच्यातच नसतात. हे मुलांमध्येही असतात. काही लोक मुद्दाम एकुलत्या एक मुलीचे स्थळ शोधत असतात.

मुलीच्या आई-वडिलांनंतर त्यांची मालमत्ता आपल्याच मुलाची होईल, हा त्यामागील धूर्त हेतू असतो. काही मुलांना मांसाहार करणारी मुलगी नको असते. स्पष्ट आणि स्वतःचे मत मांडणारी मुलगी नको असते. स्वतःची नोकरी सांभाळून घर सांभाळणारीच मुलगी हवी असते. लग्नासाठीचा बायोडाटा आणि वेगवेगळ्या जातींनुसार जी वधुवर परिचय पुस्तिका असते, ती तर फार दाहक आणि तितकीच मनोरंजन करणारी असते. स्वतः अगदी अल्पशिक्षित असूनही आपला जोडीदार मात्र इंजिनीअर, डॉक्टर, वकील आणि ‘वेल सेटल्ड’ असावा/असावी, अशी निर्ढावलेली अपेक्षा असते. मुलगी नोकरी करणारी असो किंवा नोकरी न करणारी असो, देण्याघेण्याचा विचार असतोच. लग्न ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते; पण आपल्या देशात प्रत्येक कुटुंबातील लग्नाचे जागतिकीकरण होत असते. त्यात रुसव्या-फुगव्यांपासून किलो-किलोच्या दागिन्यांपर्यंत सगळेच येते. साध्या पद्धतीने लग्न केल्यास दोघांमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशी भाबडी शंकाही येते नातेवाइकांना.

समोरच्याकडे आधी माणूस म्हणून बघणे शिकायला हवे:
लग्न ही अत्यंत तरल, हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट असते प्रत्येकाच्याच आयुष्यातील. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. ही नाती अशा अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत साथ देणे अतिशय आवश्यक आहे. आक्षेपार्ह आणि आंधळ्या अपेक्षांचा मापदंड लावून लग्न करणाऱ्यांनी, समोरच्याकडे आधी माणूस म्हणून बघणे शिकायला हवे. आर्थिक बाबतीत मुलांसह मुलींनीही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर घरकामांमध्ये मुलानेही मदत करायला हवी, हेही प्रत्येक घरात रुजवले गेले पाहिजे.

लग्न कोणाशी, सजीव माणसाशी की एटीएमशी?
आपल्याला एटीएमशी नाही, तर एका सजीव माणसाशी लग्न करायचे आहे, हे मुलींनी लक्षात ठेवावे, तर आपण सतत घरकाम करणाऱ्या एका मशीनशी लग्न करणार नाही आहोत, हे मुलग्यांनी लक्षात ठेवावे. थोडक्यात, भविष्यात जुळू पाहणाऱ्या या सुंदर रेशीमगाठींना असे अवास्तव अपेक्षांच्या बंधनात का जखडून ठेवावे? लग्नाच्या नात्यातील ‘त्याचा आणि तिचा’ प्रवास सुकर, सुसह्य आणि समंजस पद्धतीने व्हावा, एवढीच प्राथमिक अपेक्षा पुरेशी असते. एकमेकांपुढे अवास्तव आणि अनाकलनीय अपेक्षांची यादी न सरकवता एकमेकांची मने सांभाळत, प्रेमळ आणि आपुलकीच्या सोबतीने एकमेकांना सांभाळण्याचा आनंद, आयुष्यभराची सकारात्मक सोनेरी देणगी देऊन जातो. डिजिटलाइजेशनच्या जमान्यात स्वतःच्या भावनांनाही उगाच डिजिटल आणि ओव्हर प्रॅक्टिकल बनविण्यापेक्षा, भावनांना तसेच तरल राहू द्यावे. असे झाले, तरच लग्नाच्या अवास्तव अपेक्षांच्या जंजाळात हरविलेल्या माणसांचे माणूसपण डोळस पद्धतीने बघितले जाईल. लग्न ही एक अत्यंत महत्त्वाची बाब सगळ्यांच्याच आयुष्यात सकारात्मक वळण देणारी ठरेल. तेव्हाच विवाहसंस्था खऱ्या अर्थाने शुभमंगल ठरेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Over expectations of Indian bride from groom is became serious problem.

हॅशटॅग्स

#Matrimony(12)#Relationship(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x