16 April 2025 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Relationship | महिलांना समोरच्या पुरूषाची नजर व नियत लगेच समजते | तरी काही महिला का फसतात? - नक्की वाचा

The sixth sense in women about men's

मुंबई, २६ ऑगस्ट | सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रियांना six sense असतो असे म्हणतात , त्यातून त्यांना अंदाज बांधता येत असावा की कोणी त्यांच्याकडे कोणत्या कारणास्तव बोलत आहे किंवा त्यांच्याकडे काम काढत आहे. मुलांशी बोलताना सुध्दा मुलींना समजते की हा मुलगा कोणत्या प्रकारे माझ्याशी लगट करायचा प्रयत्न करत आहे किंवा कोणत्या प्रकारे हा माझ्याकडे पाहत आहे. मग प्रश्न असा येतो की एवढं सगळं असूनही त्या बाकीच्या मुलांना बळी का पडतात ?

महिलांना समोरच्या पुरूषाची नजर व नियत लगेच समजते | तरी काही महिला का फसतात? – The sixth sense in women about men’s intentions in Marathi :

याचे उत्तर म्हणजे, एक तर त्या मुलीला तो मुलगा शारीरिक रित्या आवडला असेल किंवा तो मुलगा तिला तेच दाखवतो जे तिला हवं असतं, म्हणजे जगच सर्वाना तेच दाखवतो जे त्याला दाखवायचं आहे, येथे कोणालाच कोणाचे खरे रूप माहीत नसते, तर अशा तत्सम काही गोष्टींनी ती त्याच्यासोबत असावी, अंतिमतः ती त्यात फसतेचं.

त्या मुलाच्या बाह्य गोष्टीने आणि रूपाने ती मोहीत होते, पण कसे आहे ना, जे बाह्य आहे ते कधी न कधी उघडकीस येतेच आणि अंतरंग हळूहळू वर डोकावू लागते आणि याची जाणीवच त्या मुलीला उशिरा कळते किंवा वेळ गेल्यावर उमगते.

दुसरं सत्य हे देखील:
महिलांनाच काय पण सगळ्यांनाच नजर आणि नियत ओळखता येते, अगदी लहान बाळांना सुद्धा (म्हणूनच ती काही लोकांनी घेतल्यावर रडारड करतात) असो, तर इथे प्रश्न महिलांचा आहे. तरी का फसतात याची बरीच करणे असू शकतात, जशी

१. अतिसामान्य / पोरके बालपण:
या गटातील महिलांना कुणी जरा प्रेम व आपुलकी दाखवली की पाघळून जातात. कारण लहानपणापासून तेवढी माया, प्रेम मिळाले नसते मग बरं वाटतं.

२. आधीच्या नात्यातली प्रतारणा:
काही लोकं एकदा फसवणूक झाली की खूपच संशयी बनतात तरी काही rebound mode मध्ये जातात आणि प्रेम शोधायला लागतात, असे लोकं लवकर फसतात.

३. समज कमी पडणे:
काही महिलांची (फक्त महिलाच नाही ) समज कमी पडते म्हणजे जर संगोपन लहान गावात झाले असल्याने शहरातील चकाकीला लवकर भुलतात आणि फसतात.

४. गरीबी आणि शिक्षण:
तुलनेत गरीब घरातल्या महिलांचे फसवणूकीचे प्रमाण सुशिक्षित महिलांपेक्षा जास्त असते. यात समजावण्यासारखे फार नाही. याहून वेगळी कारणे असतील आणि असुही शकतात हे देखील सत्य आहे.

तिसरं सत्य हे देखील:

१. महिलांना पुरूषांची आणि पुरूषांना महिलांची नियत जर आधीच ओळखता आली असती तर जगात एकही घटस्फ़ोट, वादविवाद, चोरी तंटे झालेच नसते. न्यायालयाची गरजच पडली नसती. सगळं जग नंदनवन होऊन जाईल.

२. जर नियत आधीच ओळखता आलीच असती तर विवाह, मैत्री वगैरे गोष्टी झाल्या नसत्या. महिला आणि पुरुष दोन्हीही परस्परांना फसवतात असे काही नाहीये की महिलाच पुरूषाना फसवतात.

३. नियत कोणाला ओळखता येत नाही आणि जेव्हा ओळख होते तेव्हा उशीर झालेला असतो. फक्त ‘विश्वास’ या एकाच शब्दावर जगरहाटी चालू आहे. एक सांगू इच्छितो की कोणावर सहज विश्वास ठेवावा पण डोळस वृत्तीने, चौकस नजरेने जगाकडे पाहिले पाहिजे नाही तर आपले काही खरे नाही हे आधी स्वीकारलं पाहिजे म्हणजे फसवणूक किंवा विश्वासघात होणार नाही. म्हणूनच अनेक महिला म्हटलं, पण सर्वच महिला फसत नसतात हे देखील सत्य आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: The sixth sense in women about men’s intentions in Marathi.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Relationship(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या