Religious Adhyatma | 'अक्षय नवमी' कधी आहे | काय आहे या दिवसाचे महत्त्व

मुंबई, २१ नोव्हेंबर: अक्षय नवमी (Akshaya Navami) म्हणजे आवळा नवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अक्षय नवमीच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय नवमी ही देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार, सतयुगाची सुरुवात अक्षय नवमीच्या दिवसापासून झाली. त्यामुळे या दिवसाला सत्य युग (Satyayuga) असेही म्हणतात. हा दिवस अक्षय तृतीयेसारखाचं (Akshay Tritiya) आहे. असे म्हणतात की, त्रेता युगाची (Treta Yuga) सुरुवातही याच दिवशी झाली होती आणि त्याला त्रेता युग म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस कोणत्याही प्रकारचे दान करण्यास अनुकूल आणि शुभ मानला जातो.
यावर्षी अक्षय नवमी 23 नोव्हेंबरला आहे. देशातील विविध भागात अक्षय नवमीला ‘आवळा नवमी’ (Amla Navami) असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, आवळ्याच्या झाडावर अनेक देवता राहतात. त्यामुळे अनेक भक्त आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. पश्चिम बंगालमध्ये अक्षय नवमीचा दिवस जगधात्री पूजा म्हणून साजरा केला जातो. तेथील लोक या दिवशी जगधात्री देवीची पूजा करतात. असं म्हटलं जात की, या दिवशी मथुरा-वृंदावनाची परिक्रमा करणाऱ्या भक्तांना आनंद आणि समृद्धी मिळते.
अक्षय नवमीच्या दिवशी (Amla Navami) स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. या दिवशी स्नान, पूजन आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. देशातील विविध राज्यात आवळा नवमीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आवळा नवमीचे व्रत केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच मोक्ष प्राप्तीदेखील होते. या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय नवमीला कुष्मंद नवमी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णूने या दिवशी कुष्मंद राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
महत्वाची टीप: या लेखातील कोणतीही माहिती, सामग्री, अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी देत नाही. ही माहिती आपल्याला विविध माध्यमांद्वारे, ज्योतिषी, पंचांग, प्रवचन, विश्वास, शास्त्रवचनांकडून संकलित करुन दिली गेली आहे. आमचा हेतू फक्त ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. वाचकाने यास केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावे.
News English Summary: Akshaya Navami is one of the most important days in Hinduism. According to Hindu calendar, this festival is celebrated on the ninth day of Shukla Paksha in the month of Kartik. Donation on the day of Akshay Navami brings merit. Akshay Navami is celebrated two days before Dev Uthani Ekadashi. According to the mythology, the Satyuga started from the day of Akshay Navami. Therefore, this day is also called Satya Yuga. This day is like Akshay Tritiya. It is said that the Treta Yuga started on this day and is also known as the Treta Yuga. This day is considered auspicious and auspicious for any kind of donation.
News English Title: Amla Navami 2020 Akshaya Navami know the importance of this day News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल