23 February 2025 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज | 246 ठिकाणी विसर्जनाची सोय

Ganesh Utsav

मुंबई, ११ सप्टेंबर | मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीचे दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी विसर्जित केल्या जातात. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज शनिवारी(११ सप्टेंबर) दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, 246 ठिकाणी विसर्जनाची सोय – BMC is ready for one and half day Ganesh Visarjan in Mumbai :

७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव:
मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

समुद्राला मोठी भरती:
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी केले जाणार आहे. मात्र शनिवारी (११ सप्टेंबर) दुपारी २.३४ वाजता ४.२२ मीटरची, तर १२ सप्टेंबरला मध्यरात्री ३.१२ वाजता ४.२३ मीटरची समुद्राला भरती आहे. १९ सप्टेंबरला दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला सकाळी ११.०८ वाजता ४.३ मीटरची, रात्री ११.२० वाजता ४.८ मीटरची तर २० सप्टेंबरला सकाळी ११.४४ वाजता ४.४० मीटरची भरती असणार आहे. यंदा समुद्रात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने दुर्घटना होणार नाही. तरीही पालिका दक्ष असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विसर्जन स्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधा:
नियंत्रण कक्ष – २१९, स्टील प्लेट – ७८६, जीवरक्षक – ८१२, मोटरबोट -१४२, जर्मन तराफा – ४३, स्वागत कक्ष – २३७, फ्लड लाईट – ३६५८, सर्च लाईट – ३६३, प्रथमोपचार केंद्र – १५४, निर्माल्य कलश – ३५६, निर्माल्य वाहन डंपर टेंपो – ३३८, तात्पुरती शौचालये – १३०, निरीक्षण मनोरे – ४७, रुग्णवाहिकांची संख्या – ८१, संरक्षक कठडे – आवश्यकतेनुसार, विद्युत व्यवस्था – आवश्यकतेनुसार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BMC is ready for one and half day Ganesh Visarjan in Mumbai.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x