16 April 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Anant Chaturdashi 2021 | पुण्यात मानाच्या गणपतींसह मुंबईतील महत्त्वाच्या ‘श्रीं’चे साधेपणाने होणार विसर्जन

Anant Chaturdashi 2021

मुंबई, १९ सप्टेंबर | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे झाकोळला आहे. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देणार आहेत. यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू होईल. त्यानंतर मानाच्या पहिल्या पाच गणपतींना महापौर मोहोळ स्वतः भेट देतील.

पुण्यात मानाच्या गणपतींसह मुंबईतील महत्त्वाच्या ‘श्रीं’चे साधेपणाने होणार विसर्जन – Anant Chaturdashi 2021 As 10-day Ganesh festival ends today, click here for list of artificial ponds and lakes in Mumbai :

कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या श्रीं ना पुष्पहार अर्पण करून मंडळांनी उभारलेल्या मंडपातील कृत्रिम कुंडात श्रीं चे विसर्जन केले जाईल. दगडूशेठ श्रींची आरती करून सायंकाळी साडेसहाला श्रींचा विसर्जन सोहळा मोजक्या कार्यर्त्यांसह पार पडेल. अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती गणेशांचेही साधेपणाने विसर्जन होणार आहे.

राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदामात्र गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. त्यासाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.

पुण्यातील गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा पुढीलप्रमाणे:
* मानाचा पहिला गणपतीश्री कसबा गणपती – सकाळी 11 वाजता
* मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी – सकाळी 11.45 वाजता
* मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम – दुपारी 12.30 वाजता
* मानाचा चौथा श्री तुळशीबाग – दुपारी 1.15 मिनीटे
* मानाचा पाचवा केसरी वाडा – दुपारी 2 वाजता
* श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती – दुपारी 2.45 वाजता
* श्रीमंत दगडूशेठ हलवाई- संध्याकाळी 6.36 वाजता

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Maharashtra tightens security on Anant Chaturdashi Pune admin issues orders for Ganesh Visarjan.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या