22 November 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Dhammachakra Pravartan Din 2021 | जाणून घ्या बौद्ध धर्मियांसाठी खास असणार्‍या या सणाविषयी

Dhamma Chakra Pravartan Din 2021

मुंबई, १४ ऑक्टोबर | बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2021). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा आणि विजया दशमी दिवशी साजरा करतात. यंदा दसरा अर्थात विजया दशमी 15 ऑक्टोबरला असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 आणि 15 ऑक्टोबरला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सेलिब्रेशन साठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात प्रार्थनास्थळं खुली झाली असली तरीही सामुहिक स्वरूपात धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा सलग दुसर्‍या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमीवर सामुदायिक स्वरूपात साजरा केला जाणार नाही.

Dhamma Chakra Pravartan Din 2021. One of the important festivals of Buddhists is Dhamma Chakra Pravartan Din. Every year Bhima followers celebrate this festival on 14th October or and Vijaya Dashami. This year Dussehra i.e. Vijaya Dashami is on 15th October so Dhamma Chakra Pravartan Day is on 14th and 15th October :

काय आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्त्व:
बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.

सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.

दरम्यान मागील दोन वर्षांपासून कोविड 19 नियमावलीचं पालन करत गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणूनच मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम जनसामान्यांसाठी खुला नसेल. मात्र ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं, भीम अनुयायींना देखील कोविड चे नियम पाळत सुरक्षितपणे हा सण साजरा करण्याचं आवाहन आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Dhamma Chakra Pravartan Din 2021 important festivals of Buddhists community.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x