Ghatasthapana 2021 | घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ वेळ

मुंबई, ०७ ऑक्टोबर | आज 7 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात (Ghatasthapana 2021) होत आहे. यंदा केवळ 8 दिवस हा उत्सव रंगणार आहे. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात. मात्र यंदा देखील या उत्सवावर कोविड-19 चे सावट असल्याने सेलिब्रेशनवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु, घरोघरी घटस्थापना करुन वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल. घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया..
Ghatasthapana 2021. Ghatasthapana Puja Vidhi rituals to perform on Sharadiya Navratri. This year, the festival will last for only 8 days. Nine forms of Durga are worshiped for nine days in this festival which is celebrated all over India :
घटस्थापना शुभ मुहुर्त:
यंदा गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी अश्निन शुक्ल प्रतिपदा असल्याने या दिवशी घटस्थापना आहे. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. या दिवशी सकाळीची वेळ घटस्थापनेसाठी मंगलदायी मानली आहे. सकाळी 8 च्या पूर्वीची वेळ घट मांडून पूजा करण्यासाठी शुभ आहे.
हे सुद्धा वाचा – Shiba Inu | क्रिप्टोकरन्सी शिबा इनूच्या किमतीत तब्बल 45% वाढ
घटस्थापना पूजा विधी:
* घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला.
* चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा.
* टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.
* कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.
* कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.
* नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा.
* कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा.
* कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.
* दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता.
* नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.
* दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.
* परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.
हे सुद्धा वाचा – Bitcoin Eyes $50,000 | बिटकॉइनची किंमत $50,000 पर्यंत परत आली
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Ghatasthapana 2021 Puja Vidhi rituals to perform on Sharadiya Navratri.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल