21 January 2025 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA
x

लालबागचा राजा | कोणत्याही प्रकारचं मुखदर्शन घेता येणार नाही | पण ऑनलाईन दर्शन सुरू - मुंबई पोलीस

Lalbaugcha Raja 2021

मुंबई, १० सप्टेंबर | भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाल्याची माहिती आता मिळत आहे. मंडळाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही या ठिकाणी दाखल झाले आहेत. मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत साधारण तासभर चाललेल्या या बैठकीनंतर अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लालबागचा राजा, कोणत्याही प्रकारचं मुखदर्शन घेता येणार नाही, पण ऑनलाईन दर्शन सुरू – Lalbaugcha Raja Pooja started after meeting with Mumbai Police Office :

माध्यमांशी बोलताना नांगरे पाटील म्हणाले, कलम १४४ खाली दुकानं बंद ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. मात्र, मंडळाशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं आहे की, दुकानात फक्त दोन जणांना मंडळ आणि मुंबई पोलिसांकडून पास दिला जाईल. आरतीलाही फक्त १० लोकांना परवानगी असेल. जर या नियमांचा भंग झाला तर पुन्हा कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येतील. भाविकांना कोणत्याही प्रकारचं मुखदर्शन घेता येणार नाही. मात्र, ऑनलाईन दर्शन सुरू आहे.

दुकानात गर्दी होऊ शकते, त्यामुळे कोरोना संसर्गाला चालना मिळेल, त्यामुळे दुकानं बंद करण्यास सांगितलं होतं. पण आता केवळ दुकानाचा मालक आणि एक कामगार अशांना परवानगी दिली आहे. लालबागचा राजा परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन घेईल. दहा लोकांना आरतीसाठी परवानगी असेल, दहा जणांमध्ये कोण सेलिब्रिटी किंवा कोणी नेता असो त्याच्याशी पोलिसांचं देणं घेणं नाही, पण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊ” असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष दर्शन, मुखदर्शन यांसाठी निर्बंध घातले आहेत. एका बाजूचे 46 आणि दुसरीकडील 47 दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आरतीसाठी 10 लोकच असतील. मध्यममार्गानं प्रश्न सोडवला. दुकानांमध्ये 1+1 अशा दोन माणसांना परवानगी मिळेल. 144 च्या ऑर्डरमध्ये मॉडीफिकेशन केले आहे. आरतीसाठी 10 लोकांना परवानगी असेल, यात कोणी सेलिब्रिटी असतील, व्हीआयपी असतील की आणखी कोणी याबाबत पोलिसांना काही देणंघणं नाही, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. लालबागच्या बाप्पाचं मुखदर्शन/प्रत्यक्ष दर्शन नसेल. केवळ ऑनलाईनच दर्शन घेता येईल. अशा सर्व चर्चेनंतर लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Lalbaugcha Raja Pooja started after meeting with Mumbai Police Office.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x