21 January 2025 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA
x

Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी

Pitru Paksha 2021

मुंबई, २० सप्टेंबर | 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष राहील. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते. धर्मग्रंथांमध्ये यात्रार्थ श्राद्ध म्हणजे तीर्थस्थानांवर जाऊन श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे, परंतु कोरोना महामारीमुळे घरतीच सहज पद्धतीने श्राद्ध करता येऊ शकते.

कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही, त्यांच्या शांतीसाठी ‘या’ विधी – Pitru Paksha 2021 Shradh Yog Sanyog puja importance significance details :

यावेळी महामारीमुळे अनेक लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही. अशा लोकांच्या आत्मा शांतीसाठी ग्रंथांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे घरीच केले जाऊ शकतात.

श्राद्धातील आवश्यक गोष्टी:
तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन, या तीन गोष्टी श्राद्धात विशेष आहेत. पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, विशेषतः स्वच्छ भांडी, जवस, तीळ, तांदूळ, कुशा गवत, दूध आणि पाणी तर्पणसाठी आवश्यक आहे. पिंड दानासाठी, तर्पण, तांदूळ आणि उडीद पिठ आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण-कांदा आणि कमी तेल, मिरची-मसाल्याशिवाय सात्विक अन्न तयार करावे. ज्यामध्ये हविष्य अन्न अर्थात भात असावा, म्हणून श्राद्ध पक्षात खीर बनवली जाते.

घरीच अशाप्रकारे करू शकता श्राद्ध आणि तर्पण: (Pitru Paksha 2021 Shradh Yog)
* श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्धकर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये. केवळ पाणी पिऊ शकता.
* दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे कुतूप काळात श्राद्ध करावे. जो 11:36 ते 12:34 पर्यंत राहतो.
* दक्षिण दिशेला मुख करून डाव्या पायाचा गुढगा जमिनीला टेकवून बसावे.
* त्यानंतर तांब्याचे खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये जवस, तीळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरे फुल आणि पाणी टाकावे.
* हातामध्ये दर्भ, कुश (एक प्रकारचे गवत) घेऊन पाणी हातामध्ये घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे. ही प्रक्रिया 11 वेळेस करत पितरांचे ध्यान करावे.
* महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे.
* पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. त्यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी.
* त्यांनतर ब्राह्मणांना जेवू घालावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा, इतर सामग्री दान करावी.

Pitru Paksha 2021 know how to make Pitar happy worship method :

कोणाला पितृ दोष लागतो:
असे मानले जाते की जे लोक पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचा आदर करत नाहीत, त्यांच्यासाठी पाणी, तिळ, कुश दान करत नाहीत आणि त्यांना नाराज करतात, त्यांना हा दोष लागतो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती आपल्या पूर्वजांचा किंवा वृद्ध व्यक्तीचा अपमान करते किंवा त्यांच्यासाठी अपमानास्पद शब्द वापरतात त्यांनाही हा पितृ दोष लागतो. असे मानले जाते की पूर्वज कोणत्याही स्वरुपात घरात येऊ शकतात, म्हणून कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट विचार मनात आणू नका किंवा त्याचा अपमान करु नका.

पितृपक्षात तर्पण कसे करावे:
सनातन परंपरेत पूर्वजांसाठीच्या श्राद्धाला खूप महत्त्व आहे. स्कंद पुराणातील केदार खंडानुसार श्राद्ध केल्याने संतान प्राप्ती होते. ‘श्राद्ध द्वै परमं यश:’ म्हणजे श्राद्धाने परम आनंद आणि कीर्ती प्राप्त होते. श्राद्ध केल्यानेच स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो. पितृपक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यासाठी पूर्वेकडे तोंड करुन तांदळासह तर्पण करावे. यानंतर, उत्तरेकडे तोंड करुन कुशसह जव पाण्यात टाकून तर्पण करावे. यानंतर दक्षिणेकडे वळून डावा पाय वळवून पाण्यात काळे तीळ टाकून कुश-मोटक घालून पितरांना तर्पण अर्पण करा.

यावेळी महामारीमुळे अनेक लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी पुत्तल-दाह क्रिया सांगण्यात आली आहे.
* यामध्ये श्राद्धपक्ष काळात मृत व्यक्तीच्या मृत्यू तिथीला उडदाच्या पीठाने त्या व्यक्तीचा पुतळा बनवून विधिपूर्वक दाह संस्कार केला जातो.
* त्यानंतर त्याच्यासाठी पिंडदान केले जाते. त्यानंतर सर्वपितृ अमावास्येला त्या व्यक्तीचे श्राद्धही केले जाते.
* ज्या लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक झाला नसेल, त्यांच्या आत्मा शांतीसाठी ग्रंथांमध्ये सूर्य पूजा सांगण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Pitru Paksha 2021 Shradh Yog Sanyog puja importance significance details.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x