धार्मिक अध्यात्म | या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही - आर्य चाणक्य
मुंबई, १८ सप्टेंबर : घरात पैसे टिकत नसतील तर चाणक्यांनी सांगितलेली नीतीमूल्ये तुमच्या उपयोगी पडतील – काय आहेत ही मूल्ये पाहूया. चाणक्य नीतीनुसार धन किंवा पैशाचा जर संचय करायचा असेल, तर सगळ्यात उत्तम पद्धत आहे की अनावश्यक खर्च न करणे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीग्रंथात अशी बरीच नीतीमूल्ये सांगितली आहेत, ज्याच्या आचरणाने कोणत्याही व्यक्तिला जीवनात येणार्या अडचणींवर पर्याय मिळू शकेल.
पैशाच्या बाबतीत सुद्धहा आचार्य चाणक्यांनी आपल्या पुस्तकात कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मतानुसार, प्रत्येक व्यक्तिला आपल्या भविष्य काळात येणार्या वाईट दिवसांचा आधीच विचार करून पैशाची बचत आधीच करून ठेवली पाहिजे. चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने अशा ठिकाणी राहू नये, जिथे त्याच्यासाठी रोजगार, काम, शिक्षण, शुभचिंतक आणि आदर व सन्मानाची कमी असेल.
चाणक्य म्हणतात, कधीही पैशाचा किंवा धनाचा मोह ठेवू नये, ज्यामुळे आपल्याला आपला धर्म सोडावा लागेल, आणि शत्रूची खुशामत करावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया, जर तुम्ही पैशाची बचत करू शकत नसाल तर, चाणक्य नीतिनुसार तुम्हाला काय शिकले पाहिजे, काय आत्मसात केले पाहिजे, स्वत:मध्ये कोणते बदल केले पाहिजेत:
अनावश्यक धन खर्च करू नका:
चाणक्य नीतिनुसार धन साठवण्याची सगळ्यात उपयोगी पद्धत आहे, की अनावश्यक खर्च न करणे. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तिला पैशाच्या बाबतीत खूपच सतर्क राहायला पाहिजे व पैसा हा फक्त एक जीवन जगण्यासाठी “साधन” आहे त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच, फक्त जीवनासाठी जरूरी म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे. साधन हे व्यक्तिला उत्तम बनवते, म्हणूनच त्याचा उपयोग विचारपूर्वक करावा. जिथे जरूर नाही, तिथे उगाच धन खर्च करू नये. जेव्हा जरूर असेल, तेव्हाच त्याचा उपयोग करावा.
धनसंचयाबरोबर गुंतवणूक पण जरूरी:
चाणक्य नीतिनुसार धनाचा योग्य प्रकारे उपयोग पण करता आला पाहिजे. बचत करण्याबरोबर धनाची गुंतवणूक पण तितकीच जरूरी आहे. त्याचा योग्य कामासाठी उपयोग व योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे जरूरी आहे व शक्य असेल तर गरजुना मदत करावयास विसरू नये. चाणक्य नीतिनुसार, ज्याप्रमाणे हंड्यात भरलेले पाणी जर उपयोगात आणले नाही, तर खराब होते, त्याचप्रमाणे, धनाचा योग्य उपयोग केला गेला नाही, तर त्याची काही किंमत राहात नाही. तसेच, धन कमावण्यासाठी माणसाकडे काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी ध्येय असले पाहिजे. कोणतेही लक्ष जर डोळ्यासमोर नसेल, तर सफलता मिळवणे कठीण आहे.
अनावश्यक चैनी करु नये:
आचार्य चाणक्य यांच्या नीतीमूल्याप्रमाणे व्यक्तिने धन प्राप्तीसाठी लोभ करु नये. धन आणि दौलतीने जीवनात समतोल साधता येतो, म्हणूनच, आपल्यासाठी एवढेच धन आवश्यक आहे, जे आपल्या प्रार्थमिक गरजा भागवू शकेल. चैनीसाठी पैसा खर्च करण्यापासून स्वत:ला वंचित ठेवले पाहिजे. व्यक्तिला आपल्या मूलभूत गरजांसाठीच धन खर्च केले पाहिजे. व्यक्तीने आपल्या श्रीमंतीचे अनावश्यक प्रदर्शन करू नये. धनाचे प्रदर्शन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला तिच्या कृपेपासून वंचित ठेवते.
पैशाचे अयोग्य नियोजन:
प्रत्येक महिन्याला पैसा तर मिळतो, ठराविक रक्कम हातात तर येते मात्र त्याचे व्यवस्थापन, त्या पैशाचे योग्य नियोजन, कसे करायचे याची जाणीव 90 टक्के लोकांना नसते. पैसा मिळवायचा कसा याचे नियोजन मात्र अनेक लोक करतात, व त्यांचा प्लॅन हि ते सांगू शकतात पण मिळलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन हे देखील महत्वाची गोष्ट आहे. पैसा मिळवणे या जगात एवढी अवघड गोष्ट नाही पण पैशाचे योग्य नियोजन व योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
News English Summary: A renowned teacher, philosopher, jurist, economist and royal advisor of ancient India, Kautilya, popularly known as Chanakya is the author of the famous political treatise Arthashatra. His story of falling ut with Dhananda lading him to seek revenge on the great empire by guiding and assisting the young ChangraguptaMaruya is well known to all. However, what one might know is that Chanakya’s book and his advises not only held relevance then, but is of extreme importance till date, even in the world of finance and investments.
News English Title: Money life lessons from Acharya Chanakya Niti Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल