17 April 2025 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

साडेसाती सुरू होण्यापूर्वी मिळतात हे १० संकेत | जाणून घ्या उपाय

Shani Sadesathi

मुंबई, २७ जून | शनीची साडेसाती म्हटली की भल्याभल्यांना घाम फुटतो. साडेसातीचे अनेक बाबतीत परिणाम होतात. कुणाचा मान-सन्मान, धन, प्रतिष्ठा पणाला लागते तर कुणाला शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. शनीची साडेसाती कुणासाठी शुभ तर कुणासाठी अशुभ ठरते. शनी आपल्या अशुभ प्रभावाचे लक्षण व्यक्तीला आधीपासूनच देऊ लागतो. जर आपण या संकेतांना ओळखू शकलो तर देवाची प्रार्थना करून साडेसातीचा प्रभाव कमी करू शकतो, जेणेकरून होणारा त्रास कमी होईल.

शनीच्या साडेसातीचा प्रभाव इतका गंभीर असतो की, तो आपण संपूर्ण नष्ट करू शकत नाही. मात्र आपल्या गुरू आणि देवदेवतांच्या पूजा-अर्चनेनं त्याचा प्रभाव कमी करू शकतो. साडेसातीचा प्रभाव जर अडीच किंवा सात वर्ष असेल तर तो काळ तसाच राहील आणि त्यावर उपायही तितके वर्ष करावा लागेल. फक्त त्यापासून होणारा त्रास मात्र उपायांनी कमी होऊ शकतो.

जाणून घ्या साडेसाती सुरू होण्यापूर्वी मिळणारे १० संकेत, असे संकेत मिळायला सुरूवात झाली तर समजा लवकरच आपली साडेसाती सुरू होणार आहे:

* संपत्तीबाबतचे वाद अचानक उद्भवतील.
* कौटुंबिक मतभेद आणि भावा-बहिणींमध्ये वाद होणं सुरू होईल.
* कुणासोबत आपले अनैतिक संबंध जुळतील आणि आपण त्यात फसाल.
* अचानक कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवेल आणि हे कर्ज वाढत जाईल
* कोर्टात फेऱ्या कराव्या लागतील किंवा वाढतील.
* नोकरीवर संकट येईल किंवा नको असलेल्या ठिकाणी बदली होईल.
* खूप मेहनत आणि कष्ट घेऊनही प्रमोशन मिळणार नाही.
* दारू, वाईट संगत किंवा खोटं बोलणं अशा वाईट सवयी लागतील.
* व्यवसायात अचानक तोटा होऊ लागेल.
* वारंवार लहान-लहान दुर्घटना घडतील.

साडेसातीच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी करा हे उपाय:
पिंपळाच्या झाडाला पाणी घालणं आणि संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावणं लगेच सुरू करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी. रविवार सोडून आपण दररोज ही पूजा करू शकतो. लक्षात ठेवा पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ता नंतरच करावी. जर आपल्याला सकाळी ही पूजा करायची असेल तर सूर्योदय होण्यापूर्वी आंघोळ करून, पांढरे वस्त्र घालून पिंपळाच्या झाडाला गायीचं दूध, तीळ आणि चंदन मिसळून पवित्र जल अर्पण करावं. जल अर्पित केल्यानंतर जानवं, फूल आणि प्रसाद अर्पण करावा. यानंतर धूप, दीप लावून आसनावर बसून कुलदैवतेचं स्मरण करावं आणि खालील मंत्राचा जप करावा.

* मूलतो ब्रह्मारूपाय मध्यतो विष्णुरूपिणे
* अग्रतः शिवरूपाय वृक्ष राजाय ते नमः
* आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसंपदम्
* देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:

या मंत्राच्या जपानंतर कापूर आणि लवंग जाळून पिंपळाच्या झाडाची आरती करावी आणि नंतर प्रसाद ग्रहण करावा. प्रसादामध्ये आपण साखरही ठेवू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Read 10 signs to shows Shani effect astrology article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या