15 April 2025 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

'मोदी नामा'ची जादू उतरली | 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल - शिवसेनेचे टीकास्‍त्र

Saamana editorial

मुंबई, २३ ऑगस्ट | 2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.

‘मोदी नामा’ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल (Loksabha Election 2024 Shivsena slams PM Narendra Modi through Saamana editorial) :

काय म्हटले सामनाच्या अग्रलेखात?

विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’सुरु केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्यशाप देण्याचेच काम सुरु केले. असे शिवसेनेने म्हटले आहे. (Loksabha Election 2024 Shivsena slams PM Narendra Modi through Saamana editorial)

19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाडय़ांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये. प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत मोदी व शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. भाजपचा पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो हे दोन राज्यांनी दाखवले. असेही लेखात म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Loksabha Election 2024 Shivsena slams PM Narendra Modi through Saamana editorial news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या