50 टक्केच्या मर्यादेवर न बोलता भाजपातील मराठ्यांनी अवसानघात केला | शिवसेनेचा घणाघाती आरोप
मुंबई, १३ ऑगस्ट | 50 टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करीत आहे, पण मराठा समाज सर्वकाही जाणतो. संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी हे मौन बाळगून बसले होते की, त्यांची तोंडे बंद केली होती? स्वतः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, पण छत्रपतींचेच वंशज ते! ते बोलायला उभे राहिलेच, पण भाजपातील इतर मराठय़ांचे काय? त्यांनी तर तसा अवसानघातच केला, अशी टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार देण्यासंदर्भातील विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. यावेळी मात्र भाजपाच्या मराठा खासदार संसदेत शांत बसले होते. त्यावरून शिवसेनेने निशाणा साधत या विधेयकाने मराठा समाजाच्या संघर्षास काही अंशी यश आले. त्यासाठी सर्व आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. मात्र केवळ या विधेयकांने मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल का असा सवाल केंद्राला केला आहे.
मराठ्यांनी क्रांतीच्या मशालीने हे शक्य:
संसदेच्या दोन्ही सभागृहांत 127 व्या घटनादुरुस्तीचे विधेयक एकमताने मंजूर झाले. ‘ओबीसी’ निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांकडे देणारे विधेयक आले. मात्र आता मागासवर्ग कोण? कोणाला आरक्षण द्यायचे? याबाबतचे अधिकार राज्यांकडे आलेच आहेत. महाराष्ट्रातील फक्त मराठा समाजालाच नव्हे तर देशभरातील जाट, गुर्जर, पटेल वगैरे अनेक समाजांच्या लोकांना या विधेयक मंजुरीचा फायदा मिळणार आहे, पण एक मात्र मान्य करावेच लागेल. महाराष्ट्रात मराठा समाजातील तरुणांनी आंदोलने करून क्रांतीची मशाल भडकवली नसती, तर काहीच घडले नसते. महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचे पाऊल पडले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
50 टक्क्यांच्या मर्यादेमुऴे मराठा आरक्षणाचे भवितव्य काय:
मराठा आरक्षण बहाल करण्यासाठी नवी घटनादुरुस्ती करून राज्यांना मागासवर्ग निश्चितीचे अधिकार द्यावे लागणार होते. तसेच दुसरे म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून आणखी वर वाढवावी लागणार होती. पण पहिली मागणी मान्य झाली, मात्र 50 टक्क्यांची मर्यादा तोडण्याबाबत केंद्राने ती मागणी लटकवून ठेवली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा ‘पेच’ काही सुटलेला नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.इंद्रा साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच म्हटले आहे की, विशिष्ट परिस्थितीत राज्यांना 50 टक्क्यांवर आरक्षण देता येईल. आता याच विशिष्ट परिस्थितीचे अवलोकन करून महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास न्याय द्यावा अशी लोकेच्छा आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत झाली. कालच्या घटनादुरुस्तीनंतर मराठा आरक्षणाचे भवितव्य काय? व आता तरी आग आणि धग थंड होईल काय? हाच प्रश्न असल्याचे मत शिवसेनेने सामनातून व्यक्त केले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena slams BJP MPs over Maratha Reservation through Saamana Editorial news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO