17 January 2025 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, - NSE: JIOFIN HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE BEL Share Price | डिफेन्स कंपनी BEL शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका
x

Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका

Bank Clerk Recruitment

Bank Clerk Recruitment | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने चालू वर्षाचे परीक्षा कॅलेंडर (IBPS परीक्षा कॅलेंडर 2025) जाहीर केले आहे. 2025 च्या परीक्षा दिनदर्शिकेत सर्व परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा दिनदर्शिकेत ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या आयबीपीएस आरआरबी अधिकारी पूर्व परीक्षेच्या तारखांचा उल्लेख आहे.

यावर्षी आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल 1 पूर्व परीक्षा 27 जुलै, 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय कॅलेंडरमध्ये सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ), मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी), स्पेशलिस्ट ऑफिसर आणि कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदांच्या भरती परीक्षेच्या तारखांचा उल्लेख आहे. बँकांमध्ये विविध पदांवर नोकरीची तयारी करणारे उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे परीक्षा कॅलेंडर डाउनलोड करू शकतात.

आईबीपीएस आरआरबी 2025: परीक्षा कॅलेंडर

बँकेतील कार्यालय सहाय्यक पदासाठी पूर्व भरती परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. ऑफिसर स्केल १, २ आणि ३ ची पूर्व परीक्षा २७ जुलै आणि २ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या यादीमध्ये मुख्य परीक्षेच्या तारखांचाही उल्लेख आहे.

Bank Clerk 1

आयबीपीएस पीओ, एमटी, सीएसए, एसपीएल 2025 परीक्षा: भरती परीक्षा कधी होणार?

बँकेत पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी, कस्टमर सर्व्हिस असोसिएट आणि स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा ४, ५ आणि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. खालील यादीमधील सर्व तपशील पहा.

Bank Clerk 2

बँक पीओ आणि मॅनेजमेंट ट्रेनी भरतीसाठी मुख्य परीक्षा यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, तर ग्राहक सेवा सहयोगी आणि विशेषज्ञ अधिकारी भरतीसाठी मुख्य परीक्षा पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे.

Latest Marathi News | Bank Clerk Recruitment Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Clerk Recruitment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x