Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ‘बँक ऑफ बडोदा’ एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. तथापि ही भरती बंपर भरती असल्याने 500 पेक्षा अधिक उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. नेमकी काय आहे या भरतीची प्रोसेस आणि पात्रता जाणून घेऊया.
भरती संबंधितच्या अर्ज करण्याच्या तारखांविषयी जाणून घ्या :
1. बँक ऑफ बडोदा येथील फायनान्स, डिजिटल बँकिंग क्षेत्रासाठी अर्ज प्रक्रिया 2024 ऑक्टोबर महिन्याच्या 30 तारखेपासूनच सुरू झाली आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी तारीख उलटून जाण्याआधीच स्वतःच्या नावाचा अर्ज नोकरीसाठी करावा. शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 दिली गेली आहे.
वयोमर्यादेविषयी जाणून घ्या :
जाहिरातीच्या अधिकृत माहितीनुसार भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे वय हे 22 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले बँक कर्मचारी आणि इतर तरुण वर्ग अर्ज प्रक्रियेसाठीचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसेल तर, भरतीसाठी पात्र आहेत.
पदांच्या तपशीला विषयी माहिती घ्या :
फायनान्ससाठी 1 पद, एमएसएमईसाठी बँकेत 140 पदांची रिक्त भरती, रिसिप्ट मॅनेजमेंटमध्ये 202 पदे, डिजिटल ग्रुपमध्ये 139 पदे तर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 22 आणि कार्पोरेट इन्स्टिट्यूशनल लोनमध्ये 79 पदांसाठी भरती आहे. याव्यतिरिक्त असिस्टंट व्हॉइसप्रेसिडेंट, रिलेशनशिप मॅनेजर आणि प्रॉडक्ट हेड यांसारख्या अनेक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तरुण वर्गांनी पदासाठी अर्ज करण्यास घाई करावी.
इतरही माहिती जाणून घ्या :
1. भरतीसाठी निवड प्रक्रिया अतिशय साधी आणि सोपी असणार आहे. तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्याचबरोबर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना देखील थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. दरम्यान अजूनही बँकेकडून मुलाखतीची तारीख सर्वांसमोर जाहीर केली नाहीये.
2. अर्जाच्या शुल्काविषयी सांगायचे झाले तर, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्ग, जनरल उमेदवारांकरिता अर्जाचे शुल्क 600 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर एसटी, एसएससी, पीडब्ल्यूडी त्याचबरोबर महिलांकरिता केवळ 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आली आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
भरतीसाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रतेत एमबीए पदवी किंवा सीएची पदवी असणे गरजेचे आहे. कारण की ही भरती बिझनेस फायनान्स मॅनेजर पदांसाठी उपलब्ध आहे. भरतीची विशेष गोष्ट म्हणजे एमएसएमई रिलेशनशिप पदांकरिता तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असली तरीसुद्धा तुम्ही नोकरी करण्याची सुवर्णसंधी पटकावू शकता.
असं करता येईल ऑनलाइन अर्ज :
1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
2. मुख्यपृष्ठावर ‘ऑनलाइन अर्ज’ अशा पद्धतीचा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून घ्या.
3. अर्जामध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
4. सांगितलेली सर्व कागदपत्र अचूक पद्धतीने आणि अचूक माहितीने अपलोड करून फॉर्म सबमिट करून घ्या.
5. अर्ज सबमिट करून डाउनलोड देखील करा आणि त्याची एक प्रिंट स्वतः जवळ ठेवा.
Latest Marathi News | Bank Job Requirement 11 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY