12 January 2025 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Bank of India Recruitment | बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी, 7'वी आणि 10'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज

Bank of India Recruitment

Bank of India Recruitment | बऱ्याच तरुण वर्गाची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. सरकारी बँक म्हणजे आणखीन उत्तम मानली जाते. त्यामुळे बरेचजण सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहतात. शिक्षण अभावी काहींचं सरकारी बँकेत नोकरी करण्याचा स्वप्न पूर्ण होत नाही परंतु बँक ऑफ इंडियामध्ये सध्या 7वी आणि 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.

काय आहे शेवटची तारीख :

ही भरती ‘वॉचमन’ पदासाठी सुरू केली गेली आहे. बँकेत नोकरी करण्याचा स्वप्न पूर्ण करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधीत म्हणावी लागेल. बँक ऑफ इंडियाने भरती संबंधितची जाहिरात प्रदर्शित केली असून ही अर्ज प्रक्रिया झोनल ऑफिसर्समार्फत करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 देण्यात आली आहे.

उमेदवाराचे वय काय असावे :

बँक ऑफ इंडियामधील जाहीर केलेल्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 22 ते 40 पर्यंत असणे गरजेचे आहे. ही भरती रत्नागिरी कार्यालयात जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अर्ज करणारा उमेदवार हा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणारा असावा.

SBI भरती :

सध्याच्या घडीला एसबीआय बँकमध्ये देखील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्वतःच्या जागेवर शिक्का मोर्तब करावा. एसबीआयमधील भरती जूनियर असोसिएट पदासाठी करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला कस्टमर सेल्स अँड रिपोर्टर या विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.

Latest Marathi News | Bank of India Recruitment Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank of India Recruitment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x