21 December 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC Gold Rate Today | खुशखबर, लग्नाच्या हंगामात आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार आणि महागाई भत्ता लवकरच वाढणार, अपडेट जाणून घ्या
x

Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लर्क पदांसाठी भरती सुरु, पगार रु.64,000 पर्यंत, शिक्षण 10 वी पास

Bank Of Maharashtra

Bank Of Maharashtra | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही चांगली संधी आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने क्रीडा कोट्यांतर्गत ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता bankofmaharashtra.in. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 8 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही इथे नोकरी करायची असेल तर दिलेल्या गोष्टी नीट वाचा.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळण्यासाठी वयोमर्यादा
अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असावी. त्यानंतरच ते या पदांसाठी अर्ज करू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अर्ज करण्याची पात्रता
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 10 वी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सक्रिय क्रीडा टप्पा संपल्यानंतर 5 वर्षांच्या आत बॅचलर डिग्री किंवा समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निवड झाल्यानंतर मिळणार पगार
या पदांसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांना 64440 रुपये वेतन दिले जाईल.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये फॉर्म भरण्यासाठी भरावे लागणार शुल्क
* जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 590 रुपये
* एसटी/एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 118 रुपये
* अर्ज आणि अधिसूचना काढण्याची लिंक येथे पहा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा – येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा
इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून आपला विधिवत भरलेला अर्ज पोस्टाद्वारे महाव्यवस्थापक, एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर पाठवावा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title :  Bank of Maharashtra Recruitment 2024 24 June 2024.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x